ग दि माडगूळकर यांच्या जयंतीचेनिमित्त साधून माडगूळकर यांची जन्मभूमी शेटफळे तालुका आटपाडी या ठिकाणाहून एक ऑक्टोबरपासून राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारे दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका गावात हा पारायण सोहळा होणार आहे हो त्याची सुरुवात एका ऑक्टोबरपासून शेटफळे या गावातुनहोणार आहे. हे कृषी पारायण सोहळा सांगली, नाशिक,जळगाव, धुळे,सातारा,कोल्हापूर, पुणे,अहमदनगर, नंदुरबार या दहा जिल्ह्यातील एका गावात हा पारायण सोहळा वर्षभरात होणार आहे. या पारायण सोहळा अंतर्गत कृषी महाविद्यालय, विविध कृषी विज्ञान केंद्रे तसेच विभागीय विस्तार केंद्रांचा मुख्य सहभाग असेल. तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी व तंत्रज्ञान विभागाचे कर्मचारीही सहभागी होतील.
पारायण सोहळा अंतर्गत होणार विविध विषयांवर मार्गदर्शन
या पारायण सोहळा च्या निमित्ताने कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतील तसेच त्यांना एकात्मिक पद्धतीने मार्गदर्शन करतील. तसेच या पारायण सोहळा अंतर्गत संबंधित गावाची जमीन, येथील मुख्य पिके,हवामान,कृषी प्रक्रिया उद्योग, रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर,स्मार्ट शेती
,सूक्ष्म सिंचनाचे प्रकार, फळबागांचे व्यवस्थापन, आधुनिक यांत्रिकी करण, मूल्यवर्धन, मातीचे आरोग्य कसे सुधारायचे तसेच सेंद्रिय शेतीचे चौफेर माहिती या व अशा अनेक विषयांवर या द्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
Share your comments