महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दृष्टिकोनातून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करता यावी यासाठी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती चे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, दस लाख रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
जर महाराष्ट्राचा विचार केला तर बहुसंख्य शेतकरी हेशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसाय हा बहुतांशी दूध उत्पादनावर अवलंबून असतो. हे दूध खाजगी तसेच सहकारी दूध प्रकल्पांना पुरणाचे तेव्हा त्या माध्यमातून आर्थिक व्यवहार पार पाडले जातात.एवढीच खासकरून भूमिका दूध उत्पादनात आहे.दूध उत्पादनामध्ये नुसते दूध पुरवठा करून न थांबता दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते.
त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले असून त्यासाठी 50 लाख रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
उत्पादित दुधावर शेतकऱ्यांना प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती चे प्रशिक्षण दिले तर शेतकऱ्यांना दूध व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा मर्यादित नफा वाढेलआणि अशा प्रक्रियायुक्त पदार्थांचे विक्रीतून शेतकऱ्यांना 30 ते 45 टक्क्यांपर्यंत जास्त नफा मिळू शकतो. परंतु राज्यात अजूनही अशा स्वरूपाच्या तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. आता ही सुविधा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी उभारत असलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
जर महाराष्ट्रातील दूध उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत.हे तीनही जिल्हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या अखत्यारीत येतात.म्हणून उभारले जाणारे हे प्रशिक्षण केंद्र अगोदर कोल्हापूरलाउभारले जाण्याची शक्यता दिसत आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या कृषी विद्यालयाला विशेष प्रकारचा निधी देखील मंजूर केला आहे.
Share your comments