मुंबई : सध्या राज्यात तापमानाने अक्षरशा हौदस माजवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर वाढलेल्या उन्हामुळे बाहेर डोकावणे देखील मोठ्या डेरिंगबाज व्यक्तीचे काम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांना अति महत्त्वाच्या कामानिमित्तचं बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात तापमानाने जवळपास 40 गाठली आहे मात्र अशातच राज्यातील नागरिकांसाठी अल्हाददायक चित्रदेखील मुंबई मध्ये बघायला मिळत आहेत. मुंबईमध्ये सध्या बहाव्याच्या झाडांना बहर आला आहे. मुंबई समवेतच बहाव्याची झाडे कोकणातही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. याशिवाय संपूर्ण मुंबईमध्ये बहाव्याची झाडे नजरेस पडतात. असे सांगितले जाते की बहाव्याच्या झाडास बहर आला म्हणजेच लवकर पाऊस येणार. म्हणजेच या झाडांचा हा बहर म्हणजे पाऊस लवकर येण्याचा संकेत मानला जातो.
हाती आलेल्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत बहाव्याची एकूण साडेचार हजार झाडे आहेत. या झाडांवर आता बहार चमकू लागल्याने मुंबईकरांच्या पावसासंबंधी आशा पल्लवित झाल्या आहेत. निश्चितच यामुळे मुंबईकरांना आल्हाददायक वातावरण लाभले आहे आणि आगामी काही दिवसात पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
सध्या बहाव्याला बहार आल्यामुळे स्वप्ना नगरी मुंबईमध्ये नयनास सुख देणारे दृश्य बघायला मिळत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी, पाऊस पडण्याची चाहूल देणारे विविध वृक्ष, पक्षी असून कोकिळेचे गाणे, कावळय़ाने घरटे बांधण्यास सुरुवात करणे, पळस व बहावा फुलणे ही पाऊस जवळ आल्याची चाहूल मानली जात असल्याचे सांगितले.
मित्रांनो वृक्ष फक्त सावलीचं देत असते असे नाही तर ते निसर्गातील बदलांबाबत देखील संकेत देत असतात. बहावा हे देखील निसर्गाच्या बदलांची चाहूल देणारे झाड आहे. याला 'नेचर इंडिकेटर' असेही संबोधले जाते.
पानझड सरून आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरू लागले आहेत. मात्र पिवळय़ाधम्मक फुलांची माळ असलेला बहावा सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. बहावा फुलला की पाऊस जवळ आला, असे म्हटले जाते. बहावा फुलल्यानंतर साधारण 45 ते 50 दिवसांनी पाऊस पडतो, असा संकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. निश्चितच या बहाव्यामुळे मुंबई समवेतच राज्यातील जनता आता समाधान व्यक्त करत असेल.
Share your comments