
symbolic image
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.
यामागील प्रमुख कारण म्हणजे या कारखान्याची टाकी फुटल्याने जवळ जवळ साडेचार हजार टन मळी आजूबाजूच्या परिसरात आणि शेकडो एकर शेतीत घुसली आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली आहे. याबाबतीत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील महर्षी नागवडे श्रीगोंदा साखर कारखान्याचे साडेचार हजार टनाचीमळी ची टाकी अचानक फुटली.
हे टाकी फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेकडो एकर शेतामध्ये ही मळी पसरली असून कारखान्याच्या आवारातील विविध भागांमध्ये तसेच यंत्रणेमध्ये सुद्धा पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं कारखान्याची देखील कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. सोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये यामुळे ची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरले असून यामुळे प्रदुषणांचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने तातडीने हा कारखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबतीत होत असलेले नुकसान आणि होणारे प्रदूषण यामुळे काहींनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, सहकार विभाग,औद्योगिक सुरक्षा मंडळ, कामगार उपायुक्त इत्यादींकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्थळाची पाहणी केली व तात्काळ कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Share your comments