1. बातम्या

Maharashtra MFOI Update : पुणे जिल्ह्यातील बारामतीत 'MFOI समृद्ध किसान उत्सव' संपन्न

समृद्ध किसान उत्सवादरम्यान कृषी जागरणच्या विशेष उपक्रम 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराबाबतही शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना MFOI बद्दल अधिक माहिती मिळू शकेल. इतकंच नाही तर 'समृद्ध किसान उत्सवा'दरम्यान शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलेनियर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे.

Samridh Kisan Utsav Baramati

Samridh Kisan Utsav Baramati

MFOI Samridh Kisan Utsav 2024 : कृषी पत्रकारितेत ओळखले जाणारे कृषी जागरण गेल्या २७ वर्षांपासून सातत्याने शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करत आहे. कृषी जागरणच्या वतीने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळ कृषी जागरण देशभरात MFOI समृद्ध किसान उत्सव २०२४ चे आयोजन करत आहे. MFOI समृद्ध किसान उत्सवाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. जेणेकरून शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवू शकतील, शेतीच्या नवनवीन तंत्रांसह शेतीशी संबंधित माहिती मिळवू शकतील आणि आपल्या कल्पनाही मांडू शकतील.

याशिवाय समृद्ध किसान उत्सवादरम्यान कृषी जागरणच्या विशेष उपक्रम 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' पुरस्काराबाबतही शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना MFOI बद्दल अधिक माहिती मिळू शकेल. इतकंच नाही तर 'समृद्ध किसान उत्सवा'दरम्यान शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या मिलेनियर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात येत आहे. १८ मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कणेरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्स, धानुकासह कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या, अनेक कृषी तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि अनेक प्रगतीशील शेतकरी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात आयोजित 'समृद्ध किसान उत्सव'

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात 'समृद्ध किसान उत्सव' आयोजित करण्यात आला होता. या 'समृद्ध किसान उत्सवा'मध्ये महिंद्रा ट्रॅक्टर्स, धानुका कंपनी आणि इसुजू कंपनी याचबरोबर अनेक कृषी तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि अनेक प्रगतीशील शेतकरी सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या या 'समृद्ध किसान उत्सवा'मध्ये ऊसातील रोग व कीड व्यवस्थापन, बाजरी लागवड आणि ट्रॅक्टर उद्योगातील नवीन शोध आणि ट्रॅक्टरची देखभाल यावर चर्चा करण्यात आली.

प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्रात आयोजित या 'समृद्ध किसान उत्सवा'मध्ये शेतीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रगतीशील मिलेनियर शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. मिलिंद जोशी (एसएमएस प्लांट प्रोटेक्शन, केव्हीके बारामती), उसातील रोग आणि कीड व्यवस्थापन, डॉ. धीरज शिंदे (वरिष्ठ शास्त्रज्ञ), शेतीमध्ये एआयच्या वापरावर, राहुल देशमुख (वरिष्ठ विक्री व्यवस्थापक, धानुका ऍग्रीटेक लि.) यांचा समावेश होता. धानुकाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना पीक काळजी आणि कंपनीच्या उत्पादनांची माहिती दिली. याशिवाय महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या वतीने रामदास उकाळे हेही येथे उपस्थित होते, त्यांनी ट्रॅक्टरच्या देखभालीबाबत सांगितले.

MFOI म्हणजे काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे MFOI काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात काही मोठे व्यक्तिमत्व आहे. ज्यांची एक खास ओळख आहे. पण, शेतकऱ्याचा विचार केला तर काहींना एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे शेतात बसलेल्या गरीब आणि असहाय्य शेतकऱ्याचा. पण खरी परिस्थिती तशी नाही. हा संभ्रम दूर करण्यासाठी कृषी जागरणने 'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया' अवॉर्ड शो हा उपक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना एक-दोन जिल्हा किंवा राज्य पातळीवरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळणार आहे.

कृषी जागरणचा हा उपक्रम केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशभरातील काही आघाडीच्या शेतकऱ्यांची निवड करून वेगळी ओळख देण्याचे काम करेल. या अवॉर्ड शोमध्ये अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे जे वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करत आहेत.

MFOI कार्यक्रम कुठे होणार?

'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-२०२३' च्या यशानंतर आता कृषी जागरण MFOI २०२४ चे आयोजन करणार आहे. जे १ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले जाईल. MFOI २०२४ ची तयारी आधीच सुरू झाली आहे. कृषी जागरण देखील किसान भारत यात्रा (MFOI किसान भारत यात्रा) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना याबाबत जागरूक करत आहे. हा प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांना MFOI बद्दल जागरूक करेल आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठ्या अवॉर्ड शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित करेल. सध्या किसान भारत यात्रा सुरू असून ही यात्रा तुमच्या शहरात, गावागावातही येऊ शकते. त्यामुळे यासंबंधित प्रत्येक माहितीसाठी कृषी जागरणच्या वेबसाइट आणि सोशल मीडियाशी कनेक्ट रहा.

English Summary: Maharashtra MFOI Update Samridh Kisan Utsav Baramati in Pune district Published on: 20 March 2024, 02:46 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters