महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर

Friday, 05 April 2019 08:14 AM


नवी दिल्ली:
एल निनोच्या प्रभावाबाबत भारतीय हवामान खाते व स्कायमेट या खाजगी क्षेत्रातील हवामान अंदाज करणाऱ्या संस्थांमध्ये मतभिन्नता आहे. पॅसिफिक क्षेत्रातील हवा, तापमान व एकूण परिस्थितीमध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे ही संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

यावर एकूणच व विशेषतः ऊस पिकाखालील क्षेत्र, उसाची उत्पादकता, ऊसाचे उत्पन्न, साखरेचे उत्पन्न, उभ्या ऊसावरील रोग-किडीची अवस्था याबाबत अचूक निदान करण्याची उच्च रेझोल्यूशन आधारित अद्यावत तंत्रज्ञान आय.बी. एम या जगप्रसिद्ध संगणक उद्योगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हवामान कंपनी सोबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या स्तरावरून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. आणि त्याआधारे हवामान अंदाज सूत्र निश्चित होण्यात यश आल्यास ते भारतीय ऊस व साखर उद्द्योगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.

दरम्यान, 25 मार्च पर्यंत देशात जवळपास 288.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 103.60 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशाचा क्रमांक असून तेथे 90.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू साखर वर्षात देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाजही श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला.

देशातील एकूण 535 साखर कारखान्यांपैकी 313 कारखान्यात आजमितीला गाळप सुरु असून त्यातून 2661.67 लाख टन उसाचे गाळप  झाले आहे. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात 925 लाख टन तर उत्तर प्रदेशात 802.21 लाख टन उसाचे गळीत झाले. साखर उत्पादनात तिसरा क्रमांक कर्नाटकाचा असून तेथे 42.90 लाख टन साखरेची निर्मिती झाली तर गुजरात मध्ये 10.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या दोन्ही राज्यात ऊसाचे गळीत प्रत्येकी 408.57 लाख टन व 99.04 लाख टन झाले आहे.

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असला तरीही साखरेच्या सरासरी उताऱ्यात उत्तर प्रदेशाने बाजी मारली असून तेथे 25 मार्च पर्यंत उताऱ्याचे प्रमाण 11.30 टक्के आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 11.20 टक्के आहे तर कर्नाटक व गुजरात मध्ये ते अनुक्रमे 10.50 टक्के व 10.40 टक्के असे आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या उत्तर प्रदेशात कधीही साखरेचा उतारा 10 ते 10.5 टक्क्याच्यावर मिळाला नव्हता त्या राज्यातील सरासरी 11.30 टक्के साखर उतारा नजरेत भरण्यासारखा आहे. या राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकता वाढीकडे विशेष लक्ष पुरविल्याने तसेच को-238 जातीच्या ऊसाखाली जवळपास 70 टक्के क्षेत्र आणल्यानेच ही जादू पहायला मिळत आहे. 

देशभरात साखरेचे उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा व उत्तराखंड या राज्यात प्रामुख्याने होते व या राज्यांमधून सहा महिन्यात तयार होणाऱ्या साखरेची विक्री मात्र वर्षभर संपूर्ण देशभरात होत असते. मात्र  गतवर्षीच्या व यंदाच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे स्थानिक बाजारातील साखर विक्रीच्या दरावर कायम दबाव टिकून राहिल्याचे दिसत आहे.

sugar साखर Skymet स्कायमेट India Meteorological Department national federation of cooperative sugar factories राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ एल निनो el nino
English Summary: Maharashtra leads in sugar production

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.