सध्या देशात मोठ्या प्रमाणावर साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखर उत्पादनाबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा साखरेचं उत्पादन 187 लाख टनांवरुन 193 लाख टन झाले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 6 लाख टनांनी वाढले आहे. तसेच देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहेत. तसेच साखर उत्पादनात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो.
यंदा महाराष्ट्रात नोव्हेंबरअखेरीस १७२ लाख टन ऊस गाळप करून १३.५० लाख टन साखर उत्पादन घेण्यात आले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील ११० कारखान्यांनी १४४ लाख टन ऊस गाळप करून १३ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्यात १३० लाख टन ऊस गाळप करून ११ लाख टन साखर उत्पादन घेण्यात आले आहे.त्या पाठोपाठ गुजरात, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील साखरेचं उत्पादन अधिक वाढल्याने आगामी काळात साखरेच्या दरात घसरण होवु शकते. त्यामुळे देशातील नागरीकांना याचा फायदा होईल.
मागिल काही दिवसांपासुन महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू असल्याने गाळप कमा प्रमाणात होत आहे. यातच उत्पादनही कमी आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस कायम राहिल्यास साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघडीवर राहण्याची शक्यता आहे. मात्र सध्या देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने राज्यातील साखरेचे दर कमी होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
Share your comments