सध्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असला तरी अजूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. अजूनही अतिरिक्त उसाचा विचार केला तर दहा टक्के ऊस शेतात उभा आहे.
या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्राने साखर उत्पादनात आपले पहिले स्थान कायम ठेवलेली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात 250 लाख टन साखरेचे उत्पादन झालेली आहे. यावर्षी साखरेच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याने इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ला देखील अंदाजपत्रकात बदल करावा लागला आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर या कालावधीमध्ये जवळजवळ राज्यातील 99 साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपला होता व कारखाने बंद झाले होते. त्या तुलनेत यावर्षी 27 साखर कारखाने फक्त बंद झाले आहेत. कारण या वर्षी पोषक वातावरण व उसाचे वाढलेल्या क्षेत्रामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ तर झालीच परंतु हंगाम देखील लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर दहा टक्के ऊस अजूनही शेतात उभा असल्याने या अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर असल्याने यावर्षी साखर आयुक्त यांच्या परवानगीनंतरच कारखान्याची गाळप बंद होणार आहे.
महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची आणि उसाची स्थिती
संपूर्ण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात 97 लाख टन साखरेचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले होते. आणि आता या महिन्यात 100 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा एक अंदाज आहे. यावर्षी राज्यातून विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे.
असे असले तरीही अजूनही उसाची तोड शिल्लक राहिल्याने हा हंगाम लांबणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागणार का? ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण या ऊसाची मुदत संपल्याने त्याच्या वजनात घट होत आहे.शिवाय हंगाम वाढवण्यात आला तरी प्रत्यक्षात ऊसतोड होणार की नाही याबाबत देखील शेतकऱ्यांमध्ये शंका आहे.
Share your comments