महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने 'महाराष्ट्र सल्लागार मंडळा'ची स्थापना करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य आणि कृषी विभाग डोळ्यासमोर ठेवून या सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.
हे जे काही महाराष्ट्र सल्लागार मंडळ स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये कृषी, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील निवृत्त अधिकारी आणि तज्ञांचा समावेश केला जाणार आहे.
नक्की वाचा:राज्यात वाढता उकाडा,पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याच्या अंदाज
काय काम असेल या सल्लागार मंडळाचे?
महाराष्ट्र सल्लागार मंडळ हे सरकारला आरोग्य,शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील संबंधित मार्गदर्शन करणार असून या मंडळातील जे काही तज्ञ असतील ते मुख्यमंत्री आणि विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन या विभागांच्या बाबतीत अनमोल मार्गदर्शन सरकारला करतील. जेणेकरून सरकारला या तीनही विभागांच्या बाबतीत निर्णय घेणे सोपे होईल.
कृषी क्षेत्रासाठी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी'
राज्यातील शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते प्रशासनाला समजावेत व त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन त्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे असते यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून शेतकर्यांच्या समस्या काय आहे
त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.या माध्यमातून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच,महसूल,ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा:कापसाला मिळणार उच्चांकी भाव! कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
Share your comments