मात्र उद्धव ठाकरे सरकार संकट अधिक गडद झाले असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे 25 आमदारांचा गुजरातला गेले आहेत. यामध्ये 15 आमदारांचा समावेश असून दहा अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे.
तसेच या घडामोडीवर गुजरात भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे की, 35 आमदार गुजरात मध्ये आहेत. शिवसेनेमध्ये होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिंदे नाराज झाले असून काल संध्याकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन देखील उचलला नाही.
मुंबईत शिवसेनेने आज विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे या बैठकीला हजर राहणार का हेदेखील पाहणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गुजरात मध्ये आहेत.
त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार फुटले असून भाजपचे सर्व पात्र उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडुन नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
नक्की वाचा:'मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..
एकनाथ शिंदे नॉटरिचेबल
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या काही आमदार देखील गुजरात येथील सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये थांबण्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांच्यासोबत महा विकास आघाडीतील 13 आमदार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळपासून महा विकास आघाडीची प्रमुख नेते त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते फोन घेत नाहीये.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. दोन्ही इलेक्शनच्या व्यूहरचनेमध्ये सुद्धा त्यांना साइड लाइन करण्यात आले होते.
नक्की वाचा:ज्यांना सहकारी कारखाना काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो'
बालेकिल्ल्यातील आमदार देखील नॉटरिचेबल
एकनाथ शिंदेयांच्यासोबत मराठवाड्यातील आमदार देखील नॉट रिचेबल आहेत.यामध्ये संदीपान भुमरे,अब्दुल सत्तार,रमेश बोरणारे,उदय सिंग राजपूत, संजय शिरसाट इत्यादी आमदार देखील नॉटरिचेबल असल्याचे कळत आहे.
शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक
शिवसेनेचे आमदार नॉटरिचेबल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असूनमहा विकास आघाडीचे किंग मेकर म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.
Share your comments