1. बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पुन्हा केले जाणार पंचनामे, सरकारची विधानसभेत माहिती

यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हातात आलेला शेतमाल मातीमोल झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेताचे पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crop damage

crop damage

 यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हातात आलेला शेतमाल मातीमोल झाला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेताचे पाहणी आणि पंचनामे पूर्ण करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले

त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे अपूर्ण असतील अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव तालुक्यातील सुरजी, सेनगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळले याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता

या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती मोठ्या प्रमाणात खरडून गेली असताना यादी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत फलकावर  प्रसिद्ध केली होती. 

तसेच संबंधित यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळवले होते. तसेच 5 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त अक्षय पान बाबत संयुक्त पथकाने शेतीचे पाणी आणि पंचनामा करून प्राप्त आक्षेप विहित कालावधीत निकाली काढले आहेत.

English Summary: maharashtra goverment do panchnaama again give information in assembly Published on: 24 December 2021, 06:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters