1. बातम्या

बिग ब्रेकिंग! गावठाण पासून 200 मीटरमधील जर जमीन असेल तर अशा जमिनीला 'एनए' ची गरज नाही, राज्य सरकारचा निर्णय

बऱ्याचदा जमीन एन ए च्या बाबतीत गोंधळ होतो. गावठाण पासून दोनशे मीटरच्या आतजमिनीचा गट आहेअशा जमिनीच्या मालकांना आता बिनशेती म्हणजेच एन ए करण्याची गरज राहणार नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
maharashtra goverment declare decision about non agriculture land

maharashtra goverment declare decision about non agriculture land

बऱ्याचदा जमीन एन ए च्या बाबतीत गोंधळ होतो. गावठाण पासून दोनशे मीटरच्या आतजमिनीचा गट आहेअशा जमिनीच्या मालकांना आता बिनशेती म्हणजेच एन ए करण्याची गरज राहणार नाही.

शासनाने याबाबतचा आदेश 13 एप्रिल 2022 रोजी जारी केला आहे.त्यामुळे बऱ्याच जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार गावठाणाची मर्यादा असते त्यामुळे त्याला लागून असलेल्या शेतीतजर तुम्हाला एखाद्या हॉटेल किंवा ढाबा,पेट्रोल पंप किंवा इतर काही व्यवसाय करायचा असेल तर असलेली जमीन एन ए  करणे आवश्यक होते.

नक्की वाचा:पांढरे सोने भविष्यात देखील राहणार तेजीत; कापसावरील आयातशुल्क रद्द         

आता ही प्रक्रिया म्हणजे अत्यंत गुंतागुंतीची आहे.अगदी शासनाच्या दहा ते बारा विभागांच्या यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतात.

इतके करून देखील याची परवानगी मिळेलच याची कुठल्याही प्रकारची हमी राहत नाही.सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे काम आहे.याबाबतचे अनेक प्रस्ताव उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे दाखल होतात मात्र एखादाच वजनदार माणसाचा प्रस्ताव मंजूर केला जातो. बरेचसे प्रस्ताव तर वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. त्यामुळे आपण जमिनीचे मालकअसून देखील त्या जमिनीचा इतर व्यवसायासाठी वापर करता येत नाही.

नक्की वाचा:आता मिटेल जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जनावरांच्या वैरणीसाठी मिळणार आता अनुदान, जाणून घेऊ या योजनेबद्दलची माहिती

त्यामुळे तुकडेबंदी मधील अडचण शासनाने ओळखून गावठाण मर्यादेच्या 200 मीटर परिसरातील जमिनीला आता एनए गरज राहणार नाही. 

यासंबंधी महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्येक पंधरा दिवसांनी स्वतः तपासणी करून आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व हा अहवाल नेहमी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. एवढेच नाही तर या संबंधीची सनद देण्याचे अधिकार देखील तहसीलदारांना देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

English Summary: maharashtra goverment declare decision about non agriculture land Published on: 15 April 2022, 07:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters