सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे.त्यामुळेशेतकऱ्यांचीखरीप हंगामाची तयारी साठी लगबग सुरू आहे. तसेच मान्सूनचे आगमन यावेळेस लवकर होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग अजूनच वाढली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकरी इतर राज्यातून कापूस बियाण्यांची खरेदी करू शकतात. त्यामुळे कापूस बियाणे विक्रीस एक जूनपूर्वी प्रतिबंधाचा जो काही आदेश आहे तो तात्काळ रद्द करून कापूस बियाणे विक्रीला परवानगी देण्याची मागणी माफदा अर्थात महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने केला आहे.
माफदाचे महासचिव विपिन कासलीवाल, अध्यक्ष विनोद तराळ यांनी या सगळ्या परिस्थितीवर निविष्ठा गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांना पत्रव्यवहार केला असून यामध्ये अप्रमाणित बियाण्यांचा विक्रीवर प्रतिबंध लागावा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होऊ शकते ते टळावे या करता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच तीन मेपासून शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
परंतु ती मागणी न पूर्ण करता निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी कपाशी बियाणे बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार वितरक किरकोळ विक्रेता यांना कापूस बियाणे पुरवण्यासाठी 15 मे ही तारीख निश्चित करण्यात आले आहे व एक जून पासून हे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
परंतु या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी कापूस बियाण्यासाठी विक्री केंद्रांवर जात आहेत परंतु एक जून पूर्वी विक्री बंदचे आदेश असल्याने विक्रेता व शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी इतर राज्यातून कापूस बियाणे खरेदी करू शकण्याची शक्यता वाढल्यामुळे या प्रकारातून सदोष बियाणे निघाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर माफदाची ऑनलाइन सभा घेण्यात आली व या सभेमध्ये शासनाच्या कृषी विभागाने दोन मे रोजी जाहीर केलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा व कापूस बियाणे विक्रीस तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी पदाधिकारी व जिल्हा संघटनेच्या अध्यक्षांनी केल्याची माहिती आहे.
महत्त्वाची माहिती
नक्की वाचा:हवेत बटाटा लागवड करा आणि दहापट अधिक नफा कमवा; जाणुन घ्या 'या' टेक्निकविषयी
नक्की वाचा:गोष्ट छोटी आभाळाएवढी; छोट्या जिऱ्याचे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे
Share your comments