कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

11 November 2020 03:18 PM By: KJ Maharashtra


सातवा वेतन आयोग आणि दहा , वीस  व तीस वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे  काही  दिवसापासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या मुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी या आंदोलन मागे घेण्यात आले आहे हि एक आनंदाची गोष्ट आहे .  यासंबंधीच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी दिवाळीनंतर बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सदर मागण्यांसाठी कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यावर मंगळवारी कृषी मंत्री दादा भुसे व त्यांचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह खासदार विनायक राऊत, राजन विचारे, योगेश कदम, आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉक्टर चिंतामणी देवकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी.

यांच्यासोबत  समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल नाईक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोकाटे व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्या सकाळी प्रतिनिधी उपस्थित होते. सदर मागण्यांच्या संदर्भात कृषी मंत्री दादाजी भुसे  यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचे जाहीर करण्यात आले.

agriculture minister Agriculture Department Governmant of Maharashtara dadaji bhuse
English Summary: Maharashtra agriculture minister visit university

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.