राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था म्हणून महानंद डेअरी ओळखली जाते.
आता महानंद डेअरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असूनदूध उत्पादक शेतकऱ्यांनात्यांनी पुरविलेल्या दुधाचे पैसे त्यांना ताबडतोब मिळावेत, त्यांचे आर्थिक अडचण होऊ नये यासाठी महानंद डेअरी रियल टाइम पेमेंट सिस्टमराबवण्याचा विचार करीत असून त्यासंबंधी हालचाली देखील सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांच्या दरम्यान कसे पैसे दिले जातील तसेच यासाठी कशी यंत्रणा परिणाम कारक उभारावी लागेल इत्यादीची आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम महानंद डेअरी कडून करण्यात येत आहे. या निर्णयाचा फायदाशेतकऱ्यांना होणार असून डेरी ला देखील भरपूर प्रमाणात दुधाचा पुरवठा होईल यात शंकाच नाही.
नक्की वाचा:आता शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा , राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
महानंदाचे दूध संकलनाचे स्वरूप
महानंद डेअरी चे जे सभासद असलेले जिल्हे आणि तालुके सहकारी दूध संघ हे शेतकऱ्यांकडून दुधाचे संकलन करतातव ते दूध महानंदला पुरवतात. नंतर या घेतलेल्या दुधाचे पैसेमहानंद संबंधित सहकारी दूध संघांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देते.जवळ जवळ असली प्रक्रिया पूर्ण व्हायला पंधरा दिवसाच्या पुढचा कालावधी लोटला जातो.
याची तुलना जर खाजगी दूध संघांशी केली तर खाजगी दूध संघ पैसे अगदी वेळेवर देतात आणि दुधाची देखील पळवापळवी करत आहेत. त्यामुळे महानंद डेअरीला दुधाचा पुरेसा पुरवठा व्हावा व दूध पुरवठादार शे
तकऱ्यांना त्यांच्या दुधाचे पैसे अगदी योग्य वेळेत मिळावेत म्हणून महानंद रियल पेमेंट सिस्टम सुरू करण्याचा विचार करत असल्याचे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार यांनी सांगितले.या सिस्टम साठी आवश्यक असणारी पायाभूत गोष्टी व त्या विषयीची माहिती घेण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही पंकज कुमार यांनी स्पष्ट केले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दुधाचा पुरवठा वाढावा यासाठी महानंदने 15 एप्रिल पासून दुधाच्या खरेदी दारामध्ये एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आता एका लिटरला 36 रुपये मिळणार आहेत. इतकेच नाही तरसभासद संघांना दूध संकलनासाठी तीन रुपये 50 पैसे तर वाहतूक खर्चापोटी दोन रुपये देखील द्यावे लागणार आहे. हा सगळा हिशोब पकडला तर आता महानंद डेअरी ला प्रति लिटर दुधासाठी 41 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.
Share your comments