1. बातम्या

MAHAFPC अन् FARMERP ची भागीदारी : महाएफपीसी होणार डिजिटल तर फार्मईआरपीचा वाढणार कृषी व्यापार


भारतातील ७०% ग्रामीण कुटुंब प्राथमिकपणे आपल्या दैनंदिन उत्पन्नाच्या स्त्रोतासाठी शेतीवर अवलंबून आहेत. यातील ८२% शेतकरी छोटे व किरकोळ आहेत. भारतातील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता ब्राझील, अमेरिका, फ्रांस आणि इतर देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, अनेक कंपन्या पुढाकार घेत एकत्र येतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अधिक फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्याचे अग्रण्य मंडळ, महाएफपीसी MAHAFPC आणि FARMERP फार्मईआरपी कंपन्या एकत्र आल्या आहेत.

दोन्ही कंपनींच्या आपआपल्या वेगळ्या ओळखी आणि कार्यक्षमता आहे. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल.  महाएफपीसीचे सहाय्यक महाव्यवस्थापक, अक्षय जायळे यांना या भागीदारीबाबत विचारले असता ते म्हणाले ‘तंत्रज्ञान आणि आमच्या कार्यप्रणालीत एक यशस्वी ताळमेळ साधने हे आमचे मुख्य ध्येय आहे. आम्ही महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांसोबत सरळ संपर्कात असून फार्मईआरपीकडे तांत्रिक बाबतीतील सखोल ज्ञान आहे.’ अक्षय यांनी म्हटले त्याप्रमाणेच फार्मईआरपी चे संस्थापक आणि सीईओ, संजय बोरकर म्हणतात महाराष्ट्रात एफपीसी च्या अग्रगण्य मंडळासोबत काम करणे हे फार्मईआरपीने योग्य दिशेला टाकलेले एक पाऊल आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना आणि कृषीव्यापाराला विविध स्तरांवर मदत आणि सहकार्य पुरवणाऱ्या या क्षेत्रातील आणखी कंपन्यांसोबत भागीदारी करण्याचे एक नवीन द्वार आमच्यासाठी उघडेल. महाएफपीसी ज्या स्फूर्तीने काम करते ते पाहून आम्ही आश्चर्यकपणे प्रभावित झालो आहोत, कारण त्यांची अग्रगण्य मंडळ म्हणून नेमणूक होण्याअगोदर त्यांनी मार्गात अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. प्राप्त करण्याच्या, साठवणूक करण्याच्या आणि इतर कार्यप्रणालीतील त्यांच्या विविध व्यवहारांमुळे कृषीव्यापार क्षेत्रात एक प्रचंड मोठा प्रभाव पडला आहे आणि यात त्यांना मदत करण्यात आम्हाला आनंद होत आहे.’

 

फार्मईआरपी एक असा तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी सक्रियपणे व प्रगतीशीलपणे शेतीच्या पद्धतींमध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कम्प्युटर विजन, कॉस्ट एनालिसिस आणि इत्यादी यांच्या माध्यमाने क्रांती घडवून आणण्याचे योगदान देण्यात मोठ्या प्रमाणात ओळख निर्माण केली आहे. तर महा शेतकरी उत्पादक कंपनीची म्हणजेच MAHAFPC ही राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन फेडरेशनचा (नाफेड) उप-प्रतिनिधी आहे. ही कंपनी शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमाने ३५०+ भागधारकांद्वारे २४ जिल्ह्यात आहे. यातील १.५ आरओसी भागधारक हे किरकोळ शेती असलेले शेतकरी आहेत. प्रत्येक एफपीसी मध्ये जवळपास ३०० शेतकरी सदस्य आहेत. अशा या महाराष्ट्रातील महा शेतकरी उत्पादक कंपनीची (महाएफपीसी) स्थापना सप्टेंबर २०१४ एसएफएसीकडून शेतकरी उत्पादक कंपन्याच्या राज्यस्तरीय संघाखाली झाली आहे.

महाएफपीसी महाराष्ट्र सरकारसाठी खरेदी करणारा राज्यस्तरीय प्रतिनिधी आहे. तसेच ते विशेषता कडधान्य, सोयाबीन, कांदा, आणि मका यात पुढील बाजार बंधनांचे काम करत आहेत. आजपर्यंत, महाएफपीसी शेतकऱ्यांकडचा ८० हजार मेट्रिक इतका माल सरळ शेतकऱ्यांकडून घेऊन तो हाताळत आहे. २०१९ यावर्षी, महाएफपीसी ने तब्बल २५ हजार मेट्रिक टन इतका कांदा मिळवला. २०२० पर्यंत ही प्राप्ती संख्या दुप्पट करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

फार्मईआरपी हा भविष्यासाठी सज्ज, कृषी ईआरपी प्लॅटफॉर्म असून तो विविध स्तरांवर कृषी आणि कृषी व्यापाराच्या सखोल तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल रुपांतर घडवून आणण्यात कारणीभूत आहे. फार्मईआरपी हा शेती-ते-थाळी असा डिजिटल प्लॅटफॉर्म असून तो जगभरात मोठ्या प्रमाणावर २५ हून जास्त देशांमध्ये कृषी पुरवठा साखळीतील विविध प्रवाहांसाठी वापरला जातो.  यात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी, कंत्राटी शेती कंपन्या, घाऊक व्यापारी, निर्यातदार, आयातदार, रिटेल विक्रेते, आणि ग्राहकांचाही समावेश होतो, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना जबरदस्त नफा होतो.  टिकाऊपणा, अन्न सुरक्षा, हवामानाशी जुळवून घेणे ही त्यांची चार मुलभूत तत्वे आहेत.  फार्मईआरपी विविध एफपीओ सोबत धडाडीने काम करत आहे ज्यामुळे या तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मवरील सुविधांचा वापर करून भागधारकांना गुणवत्ता नियंत्रण, मालाची वाहतूक करणे, डिलिव्हरी, आणि पॅकेजिंग पुरवत त्यांचा व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासाठी मदत होते.


अशा या दोन प्लॅटफॉर्मच्या एकत्र येण्यामुळे व सोबत मिळून काम करण्यामुळे कृषीव्यापार क्षेत्रावर एक सकारात्मक प्रभाव पडण्याची सुरुवात झाली आहे. तसेच याचा वापर केल्याने एकंदरीत आपल्या देशातील शेतकऱ्यांची व शेतीची परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी चांगले परिणाम मिळतील. महाएफपीसीच्या कामात तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे तंत्रज्ञानातील नवीन गोष्टींची आणि त्यांच्या फायद्यांची माहिती मिळण्यास आणि जागरूकता पसरवण्यास मदत होईल, याचा परिणाम म्हणजे बाजारात या संस्थेचा स्पर्धात्मकपणाही वाढेल.

एक शेतकरी उत्पादक कंपनी ही एकीकृत सेवा पुरवणाऱ्या खासगी मर्यादित कंपन्या व सहकारी संस्था यांना एकत्र जोडण्याचे काम करते. या सेवांमुळे भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते. आपल्या देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती आताच्या तारखेला तरी सर्वोत्तम नाही आहे. हे बऱ्याच काळापासून अनेक चर्चासत्रांमध्ये व वादविवादांमध्ये पुढे आलले एक प्रसिद्ध सत्य आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters