1. बातम्या

खुशखबर : महाबीज कडून मिळणार सोयाबीन बिजोत्पादकांना भावफरक

मागच्या हंगामात शेतकरी सोयाबीन बीजोत्पादन करतात अशा शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याने भावफरक मिळावा यासाठी ची मागणी केली जात होती. 31 डिसेंबरला अकोला येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत दरम्यान चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून हा मुद्दा उचलून धरला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mahabeej

mahabeej

मागच्या हंगामात शेतकरी सोयाबीन बीजोत्पादन करतात अशा शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याने भावफरक मिळावा यासाठी ची मागणी केली जात होती. 31 डिसेंबरला अकोला येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत दरम्यान चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून हा मुद्दा उचलून धरला.

यावर महाबीज प्रशासनाने पहिल्या टप्प्यात चारशे व नंतर दुसऱ्या टप्प्यात दोनशे असे सहाशे रुपये देण्याचे निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जवळजवळ 26000 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 त्याबद्दल अधिक माहिती अशी की, शुक्रवारी ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने महाबीज भाग धारकांसाठी ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महाबीज चे अध्यक्ष व राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापकीय संचालक  रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, संचालक वल्लभ राव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 जर गेले हंगामाचा विचार केला तर सोयाबीनचे दर हे वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये वेगवेगळे होते.त्यामुळे सोयाबीन बीज उत्पादक शेतकऱ्यांना दरम्यान त्यांना त्या मध्ये फरक जाणवत होता.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भाव प्रकारची मागणी केली जात होती. महा बिचा-या झालेल्या सर्वसाधारण सभेला चिखली तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणे आले होते. 

शेतकऱ्यांचे प्रमुख भावफरक देण्याच्या मागणीवर डवले यांनी निर्णय जाहीर केला व शेतकऱ्यांना एकूण सहाशे रुपये दिले जातील असे जाहीर केले. आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे दोन टप्प्यात  दिला जाईल.तसेच हरभऱ्याच्या राजविजय 202 या वानाच्या बियाण्याचे प्रमाणीकरण  करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याने पुढील हंगामापासून हा वाण बंद करण्यात आल्याचे महाबीज ने सांगितले. (संदर्भ -ॲग्रोवन)

English Summary: mahabij declair to give diffrent in rate to soyabioen seed productive farmer Published on: 02 January 2022, 09:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters