येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन बियाण्याची कमतरता भासू नये यासाठी उन्हाळी सोयाबीन पेरणी साठी कृषी विभागाने पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने महाबीज कडून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार होते.
त्यासाठी महाबीज कडून शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पेरणी साठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.याला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातील दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु आता महाबीज कडून उन्हाळी सोयाबीन बियाणे देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढे समस्या उभी राहिली आहे.
यावर्षी उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पेरणी साठी कृषी विभागाने 2000 हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादरम्यान महाबिजने उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.
यासाठी कृषी विभागाला सोबत घेऊन महाबिजनेबियाणे पुरवठा करू असे सांगितले. त्यासाठी प्रति एकरी नोंदणीसाठी 100 रुपये शुल्क देखील शेतकऱ्यांकडून घेण्यात आले. तसेच उत्पादित झालेल्या सोयाबीन ये महाबीज बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार होते व त्यावर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार असे जाहीर केले होते. मात्र बियाणे मागण्यासाठी शेतकरी महाबीज कडे विचारणा करू लागले आहेत. परंतु सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्ध नाहीत.
असे महाबिज कडून सांगण्यात आले असल्याचे कृषी विभागाने सांगितले. शेतकऱ्यांकडून शुल्क आकारणी करून देखील महाबीज सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे कृषी राज्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
(संदर्भ-ॲग्रोवन)
Share your comments