1. बातम्या

महाबिजाची मनमानी; वाढवले सोयाबीन बियाण्यांचे दर

कोरोना व्हायरसचे संकट संपुर्ण देशात पसरले असून या संकटाचा फटका कृषी क्षेत्रालाही बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. दरम्यान कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मराठावाड्यातील शेतकऱ्यांना महाबीजने अजून एक झटका दिला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कोरोना व्हायरसचे संकट संपुर्ण देशात पसरले असून  या संकटाचा फटका कृषी क्षेत्रालाही बसला आहे.  शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.  दरम्यान कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना महाबीजने अजून एक झटका दिला आहे.  सोयाबीनचे बियाण्यांच्या किमतींमध्ये महाबीजने ३०किलोच्या बॅगमागे तब्बल ३६० रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजेच क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ केल्याने शेतकाऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यामध्ये जवळपास ४० लाख  हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याकारणाने आधीच शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. यात आता सोयाबीन बियाण्यांची दरवाढ हे शेतकऱ्यांना डबल मार बसल्यासारंख आहे.  दरम्यान महाबीज हे महामंडळ सरकारच्या आधीन राहून काम करतं. मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा मोठा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला आहे.

बियाण्यांसाठी वापर केले जाणारे सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे असते आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचे महाबीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  मागच्या वर्षी शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाण्यासाठी दिले जाणाऱ्या सोयाबीन हे हे ६२  रुपये प्रति किलो या भावाने दिले जायचे. यावेळेस यामध्ये बारा रुपये किलोला भाव वाढ करण्यात आली आहे.  म्हणजेच ३० किलो बॅगमागे तब्बल ३६० रुपयांची भाववाढ झाली आहे. तर क्विंटल मागे एक हजार रुपये पेक्षाही जास्तीची भाव वाढ करण्यात आली आहे.

English Summary: mahabeej hike the soyabean's seeds rate Published on: 27 May 2020, 05:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters