महाराष्ट्र शासनामार्फत आशिया विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क अर्थात मॅग्नेट प्रकल्पाद्वारे कृषी क्षेत्रासाठी एक हजार कोटींची पायाभूत सुविधांची उभारणी करणार व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी संबंधित चांगल्या सेवा आणि सुविधा येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केले.
तसेच या प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सुविधा केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शेती क्षेत्रात एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे व त्यासाठी आशियाई विकास बँक 700 कोटी रुपये व राज्य शासन तीनशे कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
तसेच मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शेती क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शेती संबंधित चांगले आणि दर्जेदार सुविधा शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होईल शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही मॅग्नेट प्रकल्पाची मदत होणार आहे. शेतकरी ते ग्राहक यांच्या दरम्यान शेतमाल पोहोचताना जवळपास फळे व भाजीपाल्याचे 60 टक्के नुकसान झालेले असते.हे नुकसान साठवण व शीतसाखळी सुविधांच्या माध्यमातून कमी करता येऊ शकते. महाराष्ट्रातील केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची इत्यादी पिकांच्या मूल्य साखळी मध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत होईल.
गेल्या दीड वर्षापासून लॉक डाऊन च्या काळात विस्कटलेली आर्थिक घडी असतांना विकासाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांसाठी टप्प्याटप्प्याने 2000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.बारामती येथे उभारण्यात येणारेपहिले फळ व भाजीपाला सुविधा ताळणी केंद्र अपमानास्पद वाटेल असे उभारणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
Share your comments