खताच्या व इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी करण्यासाठी गाईचे शेण खरेदी करण्यावर मध्यप्रदेश सरकार विचार करत असल्याचेमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी सांगितलं.
तसेच आजारी पाळीव जनावरांना वाहनातून उपचारासाठी आणण्या पेक्षा अशा आजारी जनावरांसाठी जागेवरच उपचाराची सोय करण्याकरता 109 क्रमांकाची ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचेही शिवराज सिंह चव्हाण यांनी नमूद केले. भारतीय पशुवैद्यकीय संघटनेच्या महिला डॉक्टरांनी आयोजित केलेल्या शक्ती 2021या परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की गायीच्या शेणाची खरेदी करून त्यापासूनविविध प्रकारचे खाते व इतर पदार्थांची निर्मिती करण्याच्या दिशेने मध्यप्रदेश सरकार काम करत आहे. सध्या बाजाराचा विचार केला तर बाजारात गायीच्या शेनापासून खते,कीटकनाशके,औषधे व इतर वस्तू बनवल्या जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे.गाय,म्हैसआणि बैलां सारख्या इतर पाळीव प्राण्यांना देखील विविध प्रकारचे आजार होत असतात
.त्यामुळे नागरिकांसाठी असलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेच्या धर्तीवरअशा आजारी पाळीव प्राण्यांसाठी देखील 109 क्रमांकाची ऍम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा विचार आहे असे ते म्हणाले.तसेचअशा आजारी प्राण्यांना वाहनातून आणावे लागणार नाही.पशुवैद्यक जागेवर जाऊनअशा जनावरांवर उपचार करतील असे त्यांनी सांगितले
Share your comments