1. बातम्या

मध्यप्रदेशने गहू उत्पादनात बनवला रेकॉर्ड ; पंजाबला टाकले मागे


गहू उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याने राष्ट्रीय पातळीवर नवा रिकॉर्ड बनवला आहे. यावेळी मध्य प्रदेशात १.२९ कोटी मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन करून नवा रिकॉर्ड स्थापित केला आहे. देशात उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा मध्य प्रदेशात सर्वाधिक उत्पादन झाले असल्याचे राज्य सरकारचे प्रवक्ता म्हणाले आहेत.  आतापर्यंत कोणत्याही राज्याने १,२९, २८०० मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली नाही. ९७ टक्के गव्हाची खरेदी केल्यानंतर गव्हाला गोदामापर्यंत पोहचवण्यात आल्याचेही ते म्हणाले.

याशिवाय सरकारने गव्हाची खरेदी केल्यानंतर १४.८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये जमा देखील केले आहेत. मध्य प्रदेशातील ४५ जिल्ह्यात गव्हाची खरेदी झाल्यानंतर शंभर टक्के गहू गोदामात पोहचवण्यात आला. तर ७ जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमध्ये अजून गहू पडून आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे यावेळी मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी उशिराने सुरू झाली. गहू खरेदी करण्याची सुरुवात ही १५ एप्रिलपासून झाली. सरकारचे प्रवक्ता म्हणाले की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गहू खरेदी प्राथमिकता दिली आहे. गहू खरेदीवरुन त्यांनी एक आढावा बैठक घेतली. मार्च २३ पासून गहू खरेदीच्या पार्श्वभूमीवरप ७५ बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

याविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी  सतत चर्चा करण्यात आली आहे. मागील वर्षी एमपीत म्हणजेच मध्य प्रदेशात १०० लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली होती. यावेळी लक्ष्य़ मोठे ठेवण्यात आले असून यासाठी अधिक साठवणूक केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. साधारण ४५२९ खरेदी केंद्राच्या माध्यमातून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत १००० पेक्षा जास्त आहे. राज्यात यावर्षी ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात गहूची पेरणी झाली होती. मध्य प्रदेशाने गहू उत्पादनात पंजाब या राज्याला मागच्य़ा आठवड्यात मागे पाडले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters