भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेतकरीशेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन,पशूपालनतसेच मधुमक्षिका पालनासारखेव्यवसाय करतात. या सगळ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारला यांनाही मधमाशी पालनाचे महत्त्व लक्षात आल्याने मधुमक्षिका पालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या माध्यमातून बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध होईल यासाठी राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ज्या कुणी इच्छुकांना याचा लाभ घ्यायचा असेल अशा इच्छुकांनी ग्रामोद्योग मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे लागणार आहे व त्या माध्यमातून निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुणे तसेच मधसंचालनालय महाबळेश्वर येथे मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेसाठीच्या अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.तसेच अर्जदाराचे वय 21 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालनाचे माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना बेरोजगारांना लाभ व्हावा यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामध्ये अर्जदाराच्या नावाने किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुविधा असणे गरजेचे आहे. मधुमक्षिका पालनासाठी लागणारे मधपेट्या व इतर साहित्याची पन्नास टक्के स्वगुंतवणूक प्रशिक्षणा पूर्वी भरावी लागणार आहे.
प्रशिक्षण घेतल्यानंतर मिळेल 50 टक्के अनुदान..
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड आणि त्यानंतर महत्त्वाचे असणारे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मधुमक्षिका पालन व्यवसाय करता येणार आहे.हा उद्योग सुरु करण्यासाठी खादी ग्राम उद्योग मंडळाकडून मधपेट्या, मध यंत्र व इतर साहित्यासाठी लागणाऱ्या एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर 50 टक्के रक्कम ही उमेदवारास गुंतवावी लागणार आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून उत्पादित झालेले मधहमीभावाने खरेदीही करता येणार आहे.
(संदर्भ-tv9मराठी)
Share your comments