भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे सर्वात जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु शेतीरोबरच येथील शेतकरी जोडव्यवसाय सुद्धा करून आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी शेळीपालन, पशुपालन आणि दुग्ध्यवसाय यासारखे जोडव्यवसाय करत आहेत.
सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी बांधवांवर नवीन संकट ओढवले आहे. सध्या राज्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचे संक्रमन मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे हजारो जनावरे दगावली आहेत. याचा परिणाम हा दुग्ध्यवसाय यावर सुद्धा झालेला दिसून येत आहे.
लम्पी आजाराची लक्षणे:-
जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते, ही लक्षणे आपणास दिसून येतात एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान आणि भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो.
हेही वाचा:-या रानभाज्या आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर, फायदे ऐकून विश्वासच बसणार नाही, वाचा सविस्तर
लम्पी आजारामुळे या व्यवसायावर ओढवले संकट:-
लम्पी आजाराचे संकट ओढवल्यामुळे दुग्ध व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे त्यामुळे दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे. शिवाय लोक दूध खायला सुद्धा घाबरु लागले आहेत. तसेच याचा परिणाम अंडी उत्पादक आणि पोल्ट्री फार्म व्यवसायावर सुद्धा झालेला आहे.
अंडी आणि चिकन दरावर परिणाम:-
सध्या लम्पी संबंधित आजाराच्या अनेक अफवा मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्या आहेत. शिवाय लम्पी हा आजार त्वचेच्या संबंधित आहे त्याचा आणि चिकन चा कसलाच संबंध नाही. परंतु पसरलेल्या अफवांमुळे चिकन च्या भावात 20 रुपयांची घट झाली आहे तसेच अंड्याचे भाव सुद्धा उतरलेले आहे त्यामुळं लम्पी मुळे पोल्ट्री उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडले आहेत.
Share your comments