1. बातम्या

Lumpy Update : लम्पीचा प्रादुर्भाव वाढला; परभणीत ४८६ जनावरे दगावली

गतवर्षी (२०२२) ऑगस्ट ते मार्च २०२३ या ८ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८३ जनावरे दगावली होती. वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

Lumpy Skin update

Lumpy Skin update

Parbhani News :

राज्यात पुन्हा एकादा लम्पी संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. लातूर, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यापाठोपाठ आता परभणी जिल्ह्यात देखील लम्पीने हैदोस घालता आहे. यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. यंदा (२०२३) १ एप्रिल ते मंगळवार (ता. २९)पर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे ४८६ जनावरे दगावली आहेत.

८ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८३ जनावरे दगावली होती. वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आजवर २९३ वासरे दगावली आहेत अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त दिली.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त म्हणाले की, यंदा १ एप्रिलपासून मंगळवार पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३५१ जनावरांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या आजाराचे जिल्ह्यात ६५२ सक्रिय पशुरुग्ण आहे.

एकूण ४८६ जनावरे जिल्ह्यातील दगावली आहेत. जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार ८०० जनारांचे लसीकरण करण्या आले आहे. जिल्ह्यात दुसऱ्यांदा लसीकरण पूर्ण झाले. वासरांमध्ये मृत्यू प्रमाण अधिक आहे. उपचारांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.

English Summary: Lumpy prevalence increased 486 animals died in Parbhani Published on: 31 August 2023, 12:39 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters