Lumpy infectious disease : राज्यातील 'या' जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला; प्रशासन सतर्क
कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे लम्पीचा संसर्ग काही अंशी कमी झाला. पण मागील काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडेत येथे लम्पी आजाराने थैमान घातले आहे. लम्पीच्या संसर्गामुळे येथील चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे लम्पीचा संसर्ग काही अंशी कमी झाला. पण मागील काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे.
गाई, बैल या जनावरांचा अधिक प्रमाणात लागण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत लसीकरणाची मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे.
English Summary: Lumpy outbreak increased in Kolhapur district Administration alertPublished on: 29 July 2023, 03:11 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments