देशातील अनेक राज्यात आता अनलॉक केला जात आहे. परंतु शहारातून गावी परत आलेल्या मजुरांना शहरात परत काम मिळणे अवघड झाले आहे. यामुळे गावात राहून आपले जीवनक्रम परत रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकजण गावात आपला व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत. अशाच युवकांना आम्ही काही व्यवसायाच्या टिप्स देत आहोत. हे व्यवसाय फार कमी खर्चात सुरु करू शकता. साधरण १० हजार रुपयांचा खर्च आपणांस व्यवसाय सुरू करण्यास येईल.
चहा स्टॉल - चहा स्टॉलचा व्यवसाय हा सर्व हंगामात चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यास आपल्याला फार कमी जागाही लागते शिवाय व्यवसाय सुरु करण्यास खर्चही कमी लागतो.
कुकिंग क्लासेस (Cooking Classes) - स्वंयपाक करण्याची आपणांस आवड आहे तर आपण यातूनही पैसा कमावू शकता. हो, अगदी बरोबर स्वत चा कुकिंग क्लास सुरू करुन आपण आपला एक व्यवसाय सुरु करु शकता. चांगला पैसा आपण यातून कमावू शकता.
फुड ट्रक (Food Truck business) - आपणांस हॉटेलचा व्यवसाय करायचा आहे, आपल्याकडे पुरेसे भांडवल नाही. मित्रांनो काळजी करण्याचे कारण नाही जर आपल्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर आपण फुट ट्रकचा व्यवसाय सुरु करुन आपल्या हॉटेलचे स्वप्न करु शकता. सध्या अनेक जणांना स्ट्रीट फुड खूप आवडतात, त्यात आपण हा व्यवसाय फायदेकारक आहे.
Share your comments