गोंदिया जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झाला असल्यामुळे पुराच्या पाण्याने जवळपास 12 हजार हेक्टर वर लावलेल्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. जे की तेथील आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रत्यक्ष तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली तसेच काही घराचे नुकसान झाले होते त्याची सुदधा जाऊन पाहणी केली आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस पडला असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
आमदार विनोद अग्रवाल यांची कृषी विभागाला विनंती :-
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाने तात्काळ सर्व नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे असे सांगितले आहे.फक्त बसून काय झालं आहे याची पाहणी करणारे खूप प्रतिनिधी आहेत मात्र स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः त्यांच्या घरी जाऊन पाहणी करणे अशी लोक खूपच कमी असतात. जे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा आमदार विनोद अग्रवाल यांनी मनापासून व्यक्त केली आहे.
22 हजार शेतकऱ्यांना फटका :-
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असल्यामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली जे की या पुराचा फटका गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांना बसलेला आहे. ६६६ गावातील २२ हजार १८५ शेतकऱ्यांना हा धक्का बसला आहे. १२ हजार हेक्टर वर धान असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. अगदी तोंडपशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यानं मदत भेटावी अशी विनंती बळीराजाने लोकप्रतिनिधी तसेच सरकारला केलेली आहे. तर कृषी विभाग बांधावर जाऊन पंचनामे करत आहे.
जुलै ऑगस्ट महिना नैसर्गिक आपत्तीचा :-
जुलै आणि ऑगस्ट हा महिना गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा महिना ठरलेला असतो. जे की या दिवसात हमखास शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतेच. जे की या मुसळधार पावसाने जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील धानाचे नुकसान केले आहे. जे की शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती पिकवली मात्र या मुसळधार पावसाने पूर्ण वर्षभराची शेतीची वाट लावून टाकली.
Share your comments