दिवसेंदिवस वाढत्या कृषिपंपाच्या थकबाकीमुळे राज्यात विद्युत पुरवठा खंडित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जे की हे सर्व थांबवण्यासाठी राज्यात शेतकरी आंदोलने करत आहेत. परंतु या मोहिमेचा थेट द्राक्षच्या बागांवर परिणाम झालेला आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे द्राक्षचे नुकसान झाले तर आता बागांना पाणी मिळत नसल्याने नुकसान होत आहे. निफाड तालुक्यात सध्या द्राक्षे काढणी सुरू आहे जे की द्राक्षाची तोड केली की लगेच पाणी द्यावे लागते नाहीतर द्राक्ष बागेवर वाईट परिणाम होतो. तर दुसऱ्या बाजूला थकबाकीमुळे कृषिपंप बंद करण्यात आले आहेत त्यामुळे द्राक्षाच्या बागांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दावचीवाडी, पंचकेश्वर या गावातील शेतकऱ्यांनी महावितरण उपकेंद्रावर आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाचा काय फायदा होतोय हे पाहावे लागणार आहे.
नेमके बागांचे नुकसान काय?
द्राक्षाची बाग जोपासण्यासाठी योग्य प्रकारे पाणी तसेच कीटकनाशकांचे व्यवस्थापण करणे गरजेचे आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे बागांचे नुकसान झाले आहे जे की अशा परिस्थितीत निफाड तालुक्यातील द्राक्षेची तोडणी झाली होती. द्राक्षेची तोडणी करताच बागेला पानी देणे गरजेचे आहे तरच बागेची योग्य प्रकारे वाढ होणार आहे. महावितरण विभागाच्या कारवाईमुळे यंदा अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्याचा मुबलक साठा असून सुद्धा ओनी देत येत नाहीये. यामुळे बागेची योग्य प्रकारे वाढ होणार नाही आणि याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
आतापर्यंत अस्मानी संकट अन् आता सुल्तानी :-
द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षचे नेहमी नुकसान झाले आहे आहे. हे सर्व वातावरण आता कुठे निवळले आहे तो पर्यंत आता विजखंडीत केली असल्याने बागांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. द्राक्षाची तोडणी केली तर द्राक्षच्या दर्जावर परिणाम होणार नाही मात्र तोडणी करून जर बागेला पाणी दिले नाही तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
उपकेंद्रावरच शेतकऱ्यांचे आंदोलन :-
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या उपकेंद्रावर आंदोलन केले आहे जे की कृषिपंपाच्या जो विद्युत पुरवठा खंडित केला आहे तो खंडित न करता वीज पुरवठा नियमित चालू ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. पाणी असूनही द्राक्षचे नुकसान होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता या आंदोलनाचा काय परिणाम होयोय हे पाहावे लागणार आहे.
Share your comments