
Home News
पुणे : तुमच यंदाच्या नवीन आर्थिक वर्षात घर घेण्याच स्वप्न असेल. पण यंदा मात्र घर घेताना तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालीय. त्यामुळे अनेक गोष्टी महाग होणार असून नवे दर लागू झालेत. यामुळे देशातील अनेक क्षेत्रात बदल दिसून येणार आहेत. तर चला जाणून घेऊयात या नवीन आर्थिक वर्षात काय काय महाग होणार आहे.
नवीन आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीही अनेक प्रकारचे बदल केले जाणार आहेत. यासोबतच यूपीआयशी संबंधित नियमातही बदल केला जाणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरातही बदल केले जातात.स तसेच घराच्या रेडी रेकनरच्या दरात मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे घर घेणाऱ्यांना घरासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
आजपासून नवीन दरांची अंमलबजावणी लागू करण्यात आली आहे. शहरी भागात ही वाढ 5.95 टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ 3.36 टक्के आहे. तर मीरा-भाईंदरमध्ये 6.26 टक्के, कल्याण- डोंबिवलीत 5.84 टक्के, नवी मुंबईत 6.75 टक्के, पुण्यात 4,16 टक्के, नाशिकमध्ये 7, 31 टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली आहे.
रेडी रेकनर नेमकं काय आहे?
मालमत्तांचे मूल्य शहरात- गावात वेगवेगळे आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून शुल्क आकारणीसाठी एक मूल्य निश्चित करण्याची पद्धत महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे. सरकारने निश्चित केलेल्या या मूल्यांचा विभागवार तक्ता, म्हणजे रेडी रेकनर.
दरवर्षी मुद्रांक महानिरीक्षक प्रत्येक गाव-शहर आणि विभागांसाठी हा तक्ता जाहीर करतात. याला रेडी रेकनर म्हणतात. आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे.
Share your comments