Mumbai Loksabha Election Update : राज्यात लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदान पार पडत असलेल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबईतील 6 जागांचा यात समावेश आहे. यामुळे मुंबईतील सर्वच नेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सहकुंटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाकरे परिवाराला यंदा प्रथमच हाताच्या पंज्याला मतदान करावं लागलं आहे.
यंदा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या परिवाराला काँग्रेसच्या हाताचा पंजा याला मतदान कराव लागलं आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सर्वत्र लढत पार पडली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील उत्तर मध्य मुंबईतील जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हावर शिक्का मारला.
ठाकरे परिवाराने वांद्रा येथील कलानगर परिसरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी ते मतदान करतील. जुमलेबाजांनी प्रचंड पैसा वाटला आहे. मात्र, मतदान पैशांचा पाऊस स्वीकारणार नाहीत. पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Share your comments