1. बातम्या

Shivsena Update : लोकसभेची तयारी; शिंदे गट २२ लोकसभेच्या जागा लढवणार

राज्यातील एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी २०१९ साली शिवसेनेने २२ जागांवर निवडणुक लढवली. त्यावेळी शिवसेनेचे १८ खासदार निवडूण आले. शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार गेले.

Loksabha election update news

Loksabha election update news

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) देखील तयारी लागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या खासदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

राज्यातील एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी २०१९ साली शिवसेनेने २२ जागांवर निवडणुक लढवली. त्यावेळी शिवसेनेचे १८ खासदार निवडूण आले. शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार गेले. यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना बोलावून मतदार संघाचा आढावा घेतला आहे. तसंच निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा समावेश आहे. भाजपाने महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या लोकसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभेत महायुती विरुद्ध इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी गट एकत्र आले असून इंडिया आघाडी निर्माण केली आहे. भाजपाने सुद्धा NDA अंतर्गत विविध पक्षांची मोट बांधली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामना रंगणार आहे. यामुळे आगामी लोकसभेत कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतात हे पाहण महत्त्वाचं आहे.

English Summary: Lok Sabha preparations Shinde group will contest 22 Lok Sabha seats Published on: 17 October 2023, 03:21 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters