Election Update: देशात लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं असल्याने सर्वच पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तर महाराष्ट्रात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राज्यातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करतही माहिती दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवार जाहीर केले असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
१) बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ- संजय देशमुख
३) सांगली -चंद्रहार पाटील
४) हिंगोली- नागेश अष्टीकर
५) छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
६) मावळ – संजोग वाघेरे- पाटील
७) रायगड – अनंत गिते
८) रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
९) ठाणे- राजन विचारे
१०) धाराशीव- ओमराजे निंबाळकर
११) शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
१२) नाशिक- राजाभाऊ वाझे
१३) मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
१४) परभणी- संजय जाधव
१५) मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
१६) मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
१७) मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
Share your comments