MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

जोधपूरमधील शेतकरी चिंतेत ; उभ्या पिकांवर टोळांचा हल्ला, केली फवारणीची मागणी

देशात (Covid-19 ) कोरोनासारख्या आजाराने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे एक संकट चालू असतानाच राजस्थानमधील जोधपूर गावातील शेतकऱ्यांना मात्र अजून एका संकटाला सामोरे जावे लागत आहे.

KJ Staff
KJ Staff


देशात कोरोनासाऱख्या आजाराने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे एक संकट चालू असतानाच राजस्थानमधील जोधपूर गावातील शेतकऱ्यांना मात्र अजून एका संकटाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी झाली आहे, यामुळे शेतमाल बाजारात नेण्यास अडसर होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच शेतमाल पडून आहे, पण आता मालावर (नाकतोड्यांनी, ग्रास हॉपर ) टोळांनी हल्ला चढवला आहे. आधी कोरोना आणि आता नाकतोड्यांचा टोळांचा  हल्ला अशा दुहेरी संकटात जोधपूरमधील सिरमंडी गावात असलेले शेतकरी सापडले आहेत.

या (नाकतोड्यांनी) टोळक्यांनी शेतातील ज्वारी, कांदा आदीच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यामुळे सरमंडी गावातील शेतकर्‍यांची चिंता वाढली असून या भागात तटस्थीकरण व किटकनाशकांची फवारणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  मागील महिन्यात  जैसलमेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सीमेपलिकडील नाकतोड्यांच्या  टोळांच्या झुंडीचा सामना करावा लागला. ही टोळी टनोट भागात तटस्थ राहिली. त्याशिवाय श्री गंगानगरच्या हिंदुमलकोटमध्येही काही टोळक्यांना नष्ट करण्यात आले होते. यानंतर जैसलमेरचे जिल्हाधिकारी नमित मेहता यांनी राज्य टोळ नियंत्रण विभाग व कृषी विभागाकडे मे महिन्यात टोळांचा हल्ला पुन्हा होण्यासंबंधी माहिती मागितली. यासाठी त्यांनी आधीच या टोळांचा नायनाट करण्यासाठी आवश्यक कीटकनाशके, फवारणी करणारा ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची मागणी केली होती.

 

हे कीटक स्थलांतर करत असतात. साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान हे टोळ भारतात स्थलांतर करतात. एप्रिल महिन्यातच भारत – पाकिस्तान सीमेवर त्यांचे लवकरच आगमन झाल्याचे आपण पाहिले आहे. या टोळांच्या हल्ल्यामुळे डिसेंबर-जानेवारीत गुजरात आणि राजस्थानसह अनेक पश्चिम राज्यातील रब्बीची पिकांचे नुकसान केले होते. फेब्रुवारी महिन्यात टोळांनी पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील पिकांवर हल्ला केला होता. शेतजमिन आणि पिकांचे मोठे नुकसान केले होते. परिस्थिती नियंत्रणात आणणयासाठी जिल्हा प्रशासनाकडून बहुविभागीय ऑपरेशन करावे लागले होते.

English Summary: Locusts Attack on Crops in Jodhpur; worried Farmers Demand Pest Control Published on: 12 May 2020, 02:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters