पाकिस्तानमधून येणाऱ्या टोळधाडीमुळे राजस्थानसह आप-पासच्या राज्यातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. दरम्यान टोळांचा लोढा अजून येतच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे टोळांनी पिकांवर हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. दरम्यान मागील वर्षीही टोळांचा हल्ला राजस्थानमधील काही भागात झाला होता, तेव्हाही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राजस्थान राज्यातील २२ पेक्षा जास्त जिल्ह्यात टोळांनी हल्ला चढवला असून तेथील ९५ हजार हेक्टरवरील पिके टोळांनी फस्त केली आहेत.
राजस्थान व्यतिरीक्त महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातही टोळांनी हल्ला चढवला आहे. दरम्यान जुलैच्या मॉन्सून वाऱ्यासह हे टोळ परत राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशावर हल्ला करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी ड्रोन, आणि ट्रक्टरने फवारणी करून टोळांना पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. साधरण ५० लिटर कीटकनाशकांचा वापर टोळांना मारण्यासाठी केला गेला आहे. दरम्यान जर मॉन्सून सुरू होण्याआधी टोळांच्या अंड्यांना नष्ट केले तर पुढील धोका टळू शकतो. नाहीतर मॉन्सून मध्ये शेतकरी दुसऱ्या पिकांची पेरणी करत असतो. यामुळे परत टोळांनी हल्ला केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
दरम्यान मराठावाडा कृषी विद्यापीठानेही हाच उपाय सांगितलेला आहे. टोळांचा जेथे ब्रिगेड आहे तेथे मोठे खड्डे करून त्यात अंडे पुरल्यास टोळांची पुढील उत्पती पैदास होणार नाही. कारण एक वयस्कर मादी टोळ तीन महिन्याच्य़ा आपल्या जीवनचक्रात ३ वेळा साधरण ९० अंडे देते. जर आपण अंडे नष्ट नाही केले तर प्रति हेक्टर ४ ते ८ कोटी पर्यंतचे टोळ प्रति वर्ग किलोमीटरमध्ये उत्पन्न होतील.
Share your comments