सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा सुरू असून अंगाची लाही लाही करणारा उकाडा जाणवत आहे. परंतु त्यातच राज्याच्या वेशीवर लोडशेडिंगचे संकट येऊन उभे राहिले आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातल्या विजेची मागणी आणि होत असलेल्या पुरवठा याबाबत असलेल्या परिस्थितीची माहिती दिली. एवढेच नाही तर लोडशेडिंगचा इशारा देखील देण्यात आला आहे. लोडशेडिंग वर काहीतरी तोडगा निघावा यासाठी आपत्कालीन कराराच्या माध्यमातून एक हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याबाबत देखील तातडीची बैठक होणार आहे.
नक्की वाचा:अतिरिक्त उसावर अखेर अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा..
विजेची मागणी आणि लोडशेडींग
राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपत्कालीन लोडशेडिंग सुरू करण्यात आली असून त्याबाबतचे वेळापत्रक मात्र अद्याप पर्यंत जाहीर करण्यात आले नाही. सध्या आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. राज्यामध्ये ज्या भागातील वीजबिल वसुली कमी आहे त्या भागात अधिक लोड शेडींग असे सूत्र सध्या लागू करण्यात आले आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये यात वाढ होऊ शकते असे देखील शक्यता आहे.
सध्या राज्याची मुंबई सह विजेची मागणीचा विचार केला तर ती तीस हजार मेगावॅट पर्यंत जाऊ शकते. मागणीच्या मानाने पुरवठा फारच कमी असल्याने मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर वाढत आहे त्यामुळे भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे.
कोळशाची टंचाई अनुभवल्यामुळे हे लोडशेडिंगचे संकट निर्माण झाले असून कोळशाच्या तुटवड्यामुळे बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहेत. उन्हाळा सुरू असल्यामुळे विजेचे मागणी प्रचंड वाढत आहे परंतु पावसाच्या टंचाईमुळे विजेचे उत्पादन हवे तेवढे होत नसल्याने त्यावर मर्यादा येत आहेत.
त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडत असून त्याचा परिणाम विजेचा पुरवठा वर होतआहे. त्यामुळे आपत्कालीन वीज खरेदी करण्या संबंधी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यामध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments