
Minister Radhakrishna Vikhe-Patil
मुंबई
'लम्पी संसर्गजन्य' आजारामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळाले नाही त्यांना ही मदत लवकर मिळेल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे की लम्पीमुळे दगावलेल्या जनवारांच्या मालकांना आर्थिक सहाय्य करते. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी करार करण्यात आला असून पुण्यात लसनिर्मिती सुरु आहे, अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली आहे.
कशी दिली जाते पशुमालकांना मदत?
दुध देणाऱ्या जनावराचा लम्पीने मृत्यू झाला तर त्या पशुमालकांना ३० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये, वासरांच्या मालकांना १६ हजार रुपये अशी मदत सरकारकडून केली जाते, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.
Share your comments