ज्या शेतकऱ्यांनी सिंचन योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. (List of farmers) यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाला आहे ? कोणाला किती अनुदान मिळाले आहे ? याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती कशी पहायची याबाबत जाणून घेऊयात.
यासाठी सर्वात आधी मनरेगाच्या nrega.nic.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या. त्यानंतर ग्रामपंचायत वर जाऊन generate report या ऑप्शनवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्य, वर्ष, जिल्हा, तालुका व गाव निवडावे लागेल. यानंतर proceed करा. याठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुमच्या गावात सुरू असणारी सर्व प्रकारची कामे दिसतील.
येथे work status वर क्लिक करा. येथे Finantial year निवडा. येथे कामाची लिस्ट दिसेल. यामध्ये वैयक्तिक काम निवडा. याठिकाणी तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील वैयक्तिक कामे दिसतील. यामध्ये मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.
खजूर शेती आहे खूपच फायद्याची, खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, शेतकरी काही वर्षात करोडपती
शिंदे - फडणवीस सरकारने मध्यंतरी मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत (Manrega Sinchan Yojana) नवीन घोषणा केली होती. यानुसार मागेल त्याला विहरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार होते. तसेच या योजनेतील काही अटी शिथिल केल्याचे पत्रक देखील नुकतेच जाहीर केले होते.
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
दरम्यान राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास आणि 5000 रुपयांचा दंड, राज्यात नवीन नियम..
राष्ट्रवादीचं ठरलं! शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? कर्नाटक दौरा अचानक रद्द..
Share your comments