1. बातम्या

आधार कार्डला लिंक करा तुमचा मोबाईल नंबर; कोरोनाचे लसीकरणासाठी आवश्यक आहे आधार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर

आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर

 भारतात असलेल्या कोरोना महामारीच्या विरुद्ध असली लढाई जवळ-जवळ शेवटच्या टप्प्यात आहे. देशात १६ जानेवारीपासून कोविंड लसीकरण सुरू झाली आहे. या युद्धात तुमचा आधार कार्ड तुमचा आधार बनू शकते. जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक नाही, तर लवकर लिंक करणे गरजेचे आहे.

कारण कोरोना लसीकरणाविषयी असलेली माहिती आधार नंबर सोबत लिंक असलेला मोबाईल नंबरवर पाठवली जाईल.

 अत्यावश्यक आहे आधार कार्ड

 मोदी सरकारने व्हॅक्सिनेशन ड्राइव्हसाठी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश जारी केले आहेत. सरकारने कोरोना वॅक्सिंगसाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केले आहे. याचा अर्थ असा की, जर व्यक्तीला कोरोना व्हायरस इन घ्यायचे असेल तर त्यासाठी त्याच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही लसीकरणासाठी नाव नोंदणी करू शकता. भारत सरकारने सगळ्या राज्यांना निर्देशीत केले आहे की, सर्व नागरिकांना सुचित कराया की आपल्या आधार कार्डला मोबाइल नंबर सोबत लिंक करणे गरजेचे आहे.

 

कारण लसीकरणाविषयी जरुरी माहिती व्यक्तीला सुलभतेने मिळेल. जर तुमचे आधार कार्ड अगोदरपासून मोबाईल नंबरसोबत लिंक आहे तर तुम्हाला नवीन लिंक करण्याची गरज नाही. एक वेळ तुमचा युनिक हेल्थ आयडी जनरेट झाला तर संबंधित व्यक्तीचे हेल्थ रेकॉर्ड ऑनलाईन नोंद केले जाईल. अशा व्यक्तीला हॉस्पिटलच्या फाइल्स आणि संबंधित कागदपत्रे सोबत देण्याची गरज राहणार नाही. संबंधित व्यक्ती फक्त डॉक्टरांना स्वतःचा युनिक हेल्थ आयडी सांगेल आणि त्याद्वारे स्वतःच्या आरोग्याविषयी सगळी माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल.

 जर तुम्हाला कोरोना लस घ्यायची असेल तर त्यासाठीच रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यासाठी एक फोटो आयडी सोबत असणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी नाव नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची वेळ आणि ठिकाण तुम्हाला एसएमएस द्वारे मिळेल. लसीकरणाचा पहिला दोस्ताच्या चौदा दिवसानंतर दुसरा डोस मिळेल. म्हणजे जवळ-जवळ २८ दिवसांपर्यंत व्यक्तीची मॉनिटरिंग केली जाईल. लसीकरण केल्यानंतर लाभार्थीच्या मोबाईल नंबर वर एक क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र पाठवले जाईल.

 

   फोटो प्रमाणपत्र असणे आवश्यक

 रजिस्ट्रेशन आणि लसीकरणाच्या वेळेस ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जॉब कार्ड, पेन्शन रेकॉर्ड, मनरेगा कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुक यामधून कोणतेही एक आयडी कार्ड आवश्यक आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters