गेल्या दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासह पावसाची उडीप राण्याचा अंदाज आहे. आज कोकणता हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशाच्या परिसरात काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र आहे. वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
त्यामुळे मध्य महाराष्ट्र, खानदेश व विदर्भात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मात्र पोषक स्थिती अभावी पावासची उडीप आहे. उद्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण आसामच्या परिसरातही चक्राकार स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. अरबी समुद्राच्या वायव्य समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दरम्यान कोकण, विदर्भात पावसाची संततधार सुरू आहे. या भागातील काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. शनिवारी सकाळी वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील वसई येथे १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हलका पाऊस झाला आहे.
ढगाळ हवामान व पाऊस असल्याने पिकांवर कीड- रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना फवारणीकरिता देखील वेळ मिळत नसल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपचा सरी बरसल्या.
Share your comments