LIC : लहान वयापासून ते वृद्ध व्यक्ती घेऊ शकतील 'ही' एलआयसीची पॉलिसी

22 April 2021 07:12 AM By: KJ Maharashtra
jeevan labh policy

jeevan labh policy

एलआयसी (Life Insurance Corporation ) विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसी (LIC) सर्वसामान्यांना परवडेल असे विमा प्लान सातत्याने आणत असते. एका महिन्यात केलेल्या सर्वात छोट्या बचत योग्य ठिकाणी गुंतवल्यास येणाऱ्या काळात चांगला परतावा मिळू शकणाऱ्या अशाच एका एलआयसीचा प्लान बद्दल तुम्हाला या लेखात माहिती देणार आहोत. त्या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी.

जीवन लाभ पॉलिसी (Jeevan labh Policy)

 एलआयसी (LIC)च्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 8 वर्षे ते जास्तीत जास्त 54 वर्षाच्या व्यक्ती या प्लानमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर 56 व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी घेतली तर त्याच्यासाठी पॉलिसीची मुदत 21 वर्षे असते.  यापॉलिसीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,  किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम असेल, तर जास्तीत जास्त रकमेची मर्यादा यामध्ये नाही. या पॉलिसीचा कालावधी हा तीन मुदतीसाठी असतो जसे की सोळा वर्ष, 21 वर्ष आणि पंचवीस वर्ष यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये तुम्हाला 10, 15 आणि 16 वर्षे प्रीमियम द्यावे लागतात. या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला ॲक्सिडेंटल डेथ,  अपंगत्व,  अपघात लाभ, नवीन मुदतीच्या हमी  आणि नवीन गंभीर आजार याबाबतीत बेनिफिट मिळतात.

या पॉलिसीचा फायदा कसा मिळतो?

 जर तुमच्या वय 30 वर्षे असेल आणि तुम्ही जर दोन लाख रुपयांची विमा रक्कम घेतली असेल तर पॉलिसीची मुदत 25 वर्षे असेल. ज्याची प्रीमियम आपल्याला सोळा वर्षासाठी द्यावे लागेल.जर आपण एका महिन्याला पाचशे रुपये भरले तर आपली एकूण रक्कम सुमारे एक लाख 53 हजार होते. यामध्ये तुम्हाला हजार रुपये प्रमाणे प्रती 47 रुपये बोनस मिळेल.

त्यामुळे तुमचा एकूण बोनस रक्कम दोन लाख 35 हजार रुपये येईल. त्याच मॅच्युरिटी वर अतिरिक्त बोनस देखील उपलब्ध असेल. त्यास प्रति हजार रुपये मागे 450 रुपये दिले जातील. कशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटी वर सुमारे पाच लाख 25 हजार रुपये मिळतील.

  

एलआयसीची पॉलिसी Life Insurance Corporation of India LIC जीवन लाभ पॉलिसी jeevan labh policy
English Summary: Lic New Policy jeevan labh policy

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.