एलआयसी (Life Insurance Corporation ) विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. एलआयसी (LIC) सर्वसामान्यांना परवडेल असे विमा प्लान सातत्याने आणत असते. एका महिन्यात केलेल्या सर्वात छोट्या बचत योग्य ठिकाणी गुंतवल्यास येणाऱ्या काळात चांगला परतावा मिळू शकणाऱ्या अशाच एका एलआयसीचा प्लान बद्दल तुम्हाला या लेखात माहिती देणार आहोत. त्या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी.
जीवन लाभ पॉलिसी (Jeevan labh Policy)
एलआयसी (LIC)च्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी 8 वर्षे ते जास्तीत जास्त 54 वर्षाच्या व्यक्ती या प्लानमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर 56 व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी घेतली तर त्याच्यासाठी पॉलिसीची मुदत 21 वर्षे असते. यापॉलिसीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम असेल, तर जास्तीत जास्त रकमेची मर्यादा यामध्ये नाही. या पॉलिसीचा कालावधी हा तीन मुदतीसाठी असतो जसे की सोळा वर्ष, 21 वर्ष आणि पंचवीस वर्ष यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये तुम्हाला 10, 15 आणि 16 वर्षे प्रीमियम द्यावे लागतात. या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला ॲक्सिडेंटल डेथ, अपंगत्व, अपघात लाभ, नवीन मुदतीच्या हमी आणि नवीन गंभीर आजार याबाबतीत बेनिफिट मिळतात.
या पॉलिसीचा फायदा कसा मिळतो?
जर तुमच्या वय 30 वर्षे असेल आणि तुम्ही जर दोन लाख रुपयांची विमा रक्कम घेतली असेल तर पॉलिसीची मुदत 25 वर्षे असेल. ज्याची प्रीमियम आपल्याला सोळा वर्षासाठी द्यावे लागेल.जर आपण एका महिन्याला पाचशे रुपये भरले तर आपली एकूण रक्कम सुमारे एक लाख 53 हजार होते. यामध्ये तुम्हाला हजार रुपये प्रमाणे प्रती 47 रुपये बोनस मिळेल.
त्यामुळे तुमचा एकूण बोनस रक्कम दोन लाख 35 हजार रुपये येईल. त्याच मॅच्युरिटी वर अतिरिक्त बोनस देखील उपलब्ध असेल. त्यास प्रति हजार रुपये मागे 450 रुपये दिले जातील. कशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटी वर सुमारे पाच लाख 25 हजार रुपये मिळतील.
Share your comments