1. बातम्या

एलआयसी आहे सुपर; सहा महिन्यांसाठी घ्या ८० टक्क्यांपर्यंत ऑनलाइन कर्ज, ईएमआयची नाही कटकट

कोरोना संकट काळात पर्सनल लोनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळात पगारी व्यक्ती ते शेतकरी अगदी सगळेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशावेळी आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी एलयआसी पॉलिसी (LIC Policy) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
भारतीय आयुर्विमा महामंडळ

भारतीय आयुर्विमा महामंडळ

कोरोना संकट काळात पर्सनल लोनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळात पगारी व्यक्ती ते शेतकरी अगदी सगळेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशावेळी आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी एलयआसी पॉलिसी (LIC Policy) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

एलआयसीकडून (LIC)पर्सनल लोन (Personal Loan)फक्त एंडोव्हमेंट पॉलिसीवर घेता येते. जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी आहे आहे तर तुम्ही प्रिमियमच्या रकमेबदल्यात कर्ज घेऊ शकता. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीने आपल्या ग्राहकांना पर्सनल लोनची सुविधा देते आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे एलआयसीची स्कीम.

कोणाला मिळते कर्ज?

एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी भारतीय नागरिक असले पाहिजे. याशिवाय तुमच्या नावावर एलआयसी पॉलिसी असली पाहिजे. कर्जासाठी अर्ज करण्याआधी किमान तीन वर्षे प्रिमियम भरलेला असला पाहिजे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असले पाहिजे. या अटींची पूर्तता करण्याला पर्सनल लोनसाठी अर्ज करता येतो.

हेही वाचा : गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ; एसबीआय आणि पंजाब नॅशनल बँकेचा निर्णय

किती कर्ज मिळते? परतफेड कशी करतात?

एलआयसी पॉलिसीच्या बदल्यात कर्ज घेण्यासाठी पॉलिसीच्या सरेंडर रकमेच्या जास्तीत जास्त ९० टक्क्यांपर्यत कर्ज घेता येते. जर तुमची एलआयसी पॉलिसी पेडअप आहे तर सरेंडर रकमेच्या ८५ टक्क्यांपर्यतच कर्ज घेता येते. एलआयसीच्या पॉलिसीवर किमान ६ महिन्यांसाठी कर्ज घेता येते. या सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागत नाही. पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर कर्जाची रक्कम एलआयसी कापून घेते आणि उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाते. यात तुम्हाला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागते.

 

अर्ज कसा करावा?

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. एलआयसी आपल्या वेबसाईटवर ही सुविधा देते. या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर https://www.licindia.in/home/policyloanoptions या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो. लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा मिळते. इथे क्लिक केल्यानंतर मागितलेली माहिती भरा. यानंतर एक फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर हा फॉर्म प्रिंट करा. यावर सही करा आणि स्कॅन करून पुन्हा एलआयसीच्या वेबसाइटवर अपलोड करा. फॉर्म अपलोड केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर एलआयसी तुम्हाला कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू करते. एलआयसी ग्राहकाच्या बॅंक अकाउंटमध्ये ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करते.

कोरोना काळात अनेकांना कर्ज मिळवण्यासाठीदेखील अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत एलआयसीची पॉलिसी अत्यंत उत्तम पर्याय ठरू शकते. शिवाय परतफेडीसाठी ईएमआयची कटकट नसल्यामुळे मोठाच दिलासा मिळू शकतो. कर्ज मिळण्याची प्रक्रियादेखील ऑनलाइन असल्यामुळे चटकन प्रक्रिया होते.

English Summary: LIC is super; Get an online loan of up to 80% for six months, no EMI hassle Published on: 28 August 2021, 12:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters