सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आहे, मागील वर्षी कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. या कारणामुळे अनेकांची नोकरी गेली. त्यानंतर अनेकजण गावात येऊन स्वताचा व्यवसाय करुन लागले. यात अनेकांनी मोठं यश मिळवलं तर काहींनी आपल्या आयुष्याच्या नवीन वाटा शोधल्या.
दरम्यान आज आम्ही या लेखा आपल्याला अशाच काही व्यवसायाची माहिती देणार आहोत, जे आपल्याला एक चांगली कमाईचा मार्ग मिळवून देतील.जर तुम्ही गावात व्यवसाय करुन इच्छित असाल तर तुमच्याकडे व्यवसाय करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
लेमन ग्रासची शेती - सध्या सेंद्रिय आणि औषधीय शेतीला महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. लेमन ग्रास हे पण एक औषधी पीक आहे. याचा उपयोग औषधे, सौंदर्य प्रसाधने, किंवा कपडे धुण्याच्या पावडरीसाठी केला जातो. यामुळे लेमन शेती ही खूप फायदेशीर ठरत असून यातून दमदार कमाई होत आहे.
येणारा खर्च -आपल्या गावात व्यवसाय करत असाल किंवा आपले शेत असेल तर तुम्हाला फक्त ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च येईल. जर या पिकाची कापणी तीन वेळा केली तर तुम्हाला १०० ते १५० लिटर पर्यंत तेल मिळते. या पिकांची लागवड फेब्रुवारी ते जुलै महिन्याच्या दरम्यान करता येते.
एकदा लेमन ग्रासची लागवड केली तर याची कापणी ६ ते ७ वेळा करता येते. लागवड केल्यानंतर साधरण ३ ते ५ महिन्यानंतर पहिली कापणी केली जाते. याची लागवड करताना रोपांना जास्त पाने असली पाहिजे. यासाठी १-१ फुटाच्या अंतरावर या रोपांची लावणी करावी.
लेमन ग्रास कापणीवर आले की, नाही हे जाणून घेण्यासाठी लेमनचा वास घ्यावा लागेल. याचा सुगंध हा नींबू सारखी असतो. नींबू सारखा सुगंध आल्यानंतर लेमन ग्रास कापणीसाठी तयार असल्याचं समजावे. वीस गुंठ्यातून १३०० ते १५०० म्हणजेच साडेसहा ते सात क्किंटल पानांचे उत्पादन मिळतं.
याला बाजारात सरासरी ३० रुपये किलोचा दर मिळतो. यातून २ लाख १० हजारांचे उत्पन्न त्यांना मिळते. मजुरी, वाहतूक,खते असा ७५ हजारांचा खर्च वजा जाता १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा शिल्लक राहू शकतो.
Share your comments