अरविंद या तरुण शेतकऱ्याने एमबीएचे शिक्षण घेतले असून तो मल्टिनॅशनल बँकेमध्ये लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी करत होता. बँकेमध्ये त्याला जास्त दिवस काम करत असल्याने नकोसे वाटू लागले त्यामुळे त्याने गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला होता. गावी आल्यानंतर आपले वडील पारंपरिक पद्धतीने शेती करत होते ते अरविंद ने पाहिले. अरविंद ने नवीन तंत्रज्ञान वापरून अजून जास्त उत्पादन भेटेल असे मनोमन निर्धार करून शेती करण्यास चालू केले.
शेतीबाबत वडिलांशी बोलणे :-
अरविंद ने सांगितले की ज्या ज्या वेळी मी गावात यायचो त्यावेळी मी शेतीबद्धल वडिलांना विचारायचो. शेतीची सतत माहिती मिळत असल्याने माझे मन शेतीकडे ओळले आणि एक दिवस असा आला की वडिलांशी बोलत असताना शेती करण्याचा विचारच मनात आला आणि तसेच झाले. दिवसेंदिवस शेतीत प्रगती पण करत गेलो आणि अगदी कमी वेळात मला यश संपादन झाले.
अरविंद कमवतायत दरवर्षी करोडो रुपये :-
अरविंद त्यांच्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा प्रगत शेती कशा प्रकारे करायची तसेच त्यांनी झिरो बजेट शेतीमधून कशा प्रकारे सुरुवातीस लाखो रुपये तर आता करोडो रुपये कमावले याबद्धल सुद्धा ते सांगतात. आजच्या काळात असे अनेक युवा शेतकरी आहेत जे शेतीकडे पाठ फिरवतात त्यांच्यासाठी अरविंद हे एक मोठे उदाहरण आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन काढावे असे अरविंद सांगतात.
अरविंद शेतकरी बांधवांना सांगतायत शेतीबद्धल गुण :-
आजच्या काळात शेतकरी पेरणी करताना भरपूर प्रमाणत बियाणे पेरतात तसेच पिकांना अनेक प्रमाणत रसायनांचा वापर करीत आहेत जे की यामुळे खर्च ही वाढत आहे तसेच रसायनांचा जास्त वापर करत असल्याने पिकाचे उत्पादन तर वाढतय मात्र जमिनीची सुपीकता कमी होत निघाली आहे. मात्र जे शेतकरी कमी बियानात तसेच कमी प्रमाणात रसायने वापरून शेती करतात त्यांचा खर्च सुद्धा कमी होतो आणि चांगले पीक सुद्धा भेटते.
सेंद्रिय खते वापरून कमवतायत करोडो रुपये :-
अरविंद ने सांगितले की शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करून मला खूप फायदा झाला जे की यासाठी खर्च कमी व उत्पादन जास्त निघाले. सेंद्रिय पद्धतीने शेती करून मी अगदी कमी खर्चात शेती पिकवली आणि आज त्यामधून करोडो रुपये कमवत आहे. अरविंद विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करून सुद्धा शेतीमधून आर्थिक उत्पन्न दुप्पट मिळवत आहेत.
Share your comments