1. बातम्या

Hydroponic Farming : जाणून घ्या हायड्रोपोनिक शेतीचे तंत्र आणि फायदे

भारत हा अन्नधान्य निर्यात करणारा मोठा देश बनला आहे, परंतु या प्रगतीमध्ये लोकांना आवश्यक पोषक घटकांऐवजी हानिकारक पदार्थ मिळत आहेत, त्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. शेतीचे वैविध्य, जमिनीची सुपीकता आणि शेतीसाठी पाण्याची आणि जमिनीची कमतरता आहे. अशा स्थितीत भविष्यात शुद्ध पाणी आणि अन्नाच्या टंचाईला सामोरे जावे लागेल, तो दिवस दूर नाही. त्यामुळेच हायड्रोपोनिक शेती हा या समस्यांवर उपाय म्हणून समोर येत आहे.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
hydroponic farming

hydroponic farming

भारत हा अन्नधान्य निर्यात करणारा मोठा देश बनला आहे, परंतु या प्रगतीमध्ये लोकांना आवश्यक पोषक घटकांऐवजी हानिकारक पदार्थ मिळत आहेत, त्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. शेतीचे वैविध्य, जमिनीची सुपीकता आणि शेतीसाठी पाण्याची आणि जमिनीची कमतरता आहे. अशा स्थितीत भविष्यात शुद्ध पाणी आणि अन्नाच्या टंचाईला सामोरे जावे लागेल, तो दिवस दूर नाही. त्यामुळेच हायड्रोपोनिक शेती हा या समस्यांवर उपाय म्हणून समोर येत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हायड्रोपोनिक शेती ही मातीविना केली जाते. हायड्रोपोनिक शेती हे शेतीचे भविष्य आहे. या तंत्रात वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक तत्वांचा वापर द्रव्य स्वरूपात केला जातो.

हायड्रोपोनिक तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके -
हायड्रोपोनिक शेती मातीविना केली जाते. या तंत्रात, पाण्यात विरघळणारी पोषक तत्त्वे पाण्याद्वारे झाडांना पुरवली जातात. हायड्रोपोनिक्समध्ये मातीची जागा कोको पिटने घेतली जाते. स्ट्रॉबेरी, टोमॅटो, सिमला मिरची, मिरची आणि फ्रेंच बीन्स यांसारख्या पिकांसह पौष्टिक पालेभाज्या पिकवण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक चांगले आहे.

हायड्रोपोनिक शेतीमध्ये, तुम्ही कृत्रिम प्रकाशाखाली खोलीतही शेती करता येते. याशिवाय शहरातील छतावर, बाल्कनीत शेती करता येते. या शेतीचा एक फायदा असा आहे की त्यात फार कमी पाणी वापरले जाते. पिकावर कीड व रोगाचा धोकाही कमी असतो आणि तण व्यवस्थापनामुळे त्यातून सुटका होते. यामुळे खर्चात लक्षणीय घट होते. किमान 25 हजार ते 1 लाख रुपये खर्चून याची सुरुवात करता येते.

हायड्रोपोनिक्स तंत्राचे फायदे -
90% पाण्याची बचत होते.
जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.
वर्षभर उत्पादन घेता येते.
हायड्रोपोनिक्स मध्ये तने, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो.
मशागत, आंतर मशागत, सिंचन, खुरपणी अशी कामे करावी लागत नाही. परिणामी वेळेची आणि मजुरांची बचत होते.
कमीत कमी जागेत होते जागेमध्ये नियंत्रित पद्धती व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते.
पाण्यामध्ये पोषक खनिज द्रव्य मिसळली जातात असून मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे पिकांद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन लवकर वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये 50 टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

English Summary: Learn the techniques and benefits of hydroponic farming Published on: 14 November 2023, 06:04 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters