पावसाळ्यात जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत चारा आणि पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून ठेवावी. उपलब्ध चारा व शेतातील पिकांचे अवशेष जसे वाळलेले गवत, गव्हाचे काढ, भात पेढा, तूर व हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेली वैरण इत्यादींची योग्य रीतीने साठवणूक करावी.
त्याची पचनियता व पौष्टिकता वाढवणेसाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात. आपल्याकडे अनेकदा शेतीतील पिकांचे वाळलेल्या अवशेषांना सुका चारा संबोधले जाते परंतु पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये आणि हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय.
◆सुका चारा साठवण करताना ज्यास्तीत ज्यास्त उंचीची गंज शक्यतो टाळावी. कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालावते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते.
पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
◆जेथे पावसाळ्यात पाणी साठवून राहणार नाही अशा ठिकाणी साठवण करावी. चारा साठवणूक जमिनीपासून १-२ फुट उंचीवर लाकडाचे ओंडके ठेऊन किंवा दगडांच्या साहाय्याने करावी. जेणे करून सहज पावसाच्या पाण्याचा निचरा होईल.
◆पूर्व तयारी म्हणून चारा साठवण्यासाठीची जमीन एकसारखी समांतर करून घ्यावी.
◆डंबेल शेप पद्धतीत चाऱ्याची साठवण करावी शेवटचा थर हा योग्य पद्धतीने लावून घ्यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अणकुचीदार अवशेष वरती येणार नाहीत.
◆वातावरणातील घटकांपासून संरक्षण होण्यासाठी चारा चहुबाजुंनी झाकला जाईल यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करावा.
◆चारा साठवणूक ही संपूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशा ठिकाणी करावी जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आद्रतेमुळे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणार नाही. चारा टिकण्यासाठी मदत होईल.
जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
●सुका चारा पचनास योग्य आणि अधिक पौष्टीक करण्यासाठी करावा लागणाऱ्या प्रक्रिया या साठवण करताना चाऱ्यामध्ये असणाऱ्या ओलाव्याचे प्रमाण यावरून कराव्यात. सुक्या चाऱ्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे २० टक्यांपेक्षा कमी असावे, जेणेकरून कोणत्याही बुरशीच्या वाढीस योग्य वातावरण तयार होणार नाही.
समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या..
अभिमानास्पद ! IFAJ मध्ये भारताचा 61 वा सदस्य देश म्हणून समावेश
Share your comments