1. बातम्या

आपला शेतीमाल कसा कराल निर्यात, जाणून घ्या कागदपत्रांची माहिती

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. त्यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा आणि निर्यातक्षम भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो.

KJ Staff
KJ Staff


सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत.  त्यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा आणि निर्यातक्षम भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो. आताच्या काळामध्ये बरेचसे शेतकरी आपला भाजीपाला विदेशात निर्यात करण्याची तयारी करत असतो.  परंतु विदेशात भाजीपाला निर्यात करण्यासाठी बर्‍याचशा कागदपत्रांची आवश्यकता असते,  त्यातील काही कागदपत्रांची ओळख आपल्या लेखात करू.

  • आयात निर्यात परवाना
  •  भाजीपाला निर्यात करण्यासाठी सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांना आयात निर्यात परवाना काढणे आवश्यक असतो.  हा परवाना काढण्यासाठी खालीलपैकी आवश्यक कागदपत्रे लागतात.
  •  संस्था नोंदणी प्रमाणपत्र ( त्याची झेरॉक्स प्रत), भारताच्या आयकर विभागाकडून मिळणारा कायम खाते क्रमांक व त्याची झेरॉक्स प्रतप्रपत्र बीनुसार बँकेच्या लेटरहेडवर प्रमाणपत्र.
  • दोन पासपोर्ट साईज फोटो.  
  • बँकेचे प्रपत्र  त्यावरील आपल्या पासपोर्ट साईज फोटो वर बँक अधिकाऱ्याची साक्षांकन आवश्यक असते.   
  • सहसंचालक विदेश व्यापार यांची नावे इंग्रजी अक्षरात लिहिलेले एक हजार रुपयांचा पुणे किंवा मुंबई येथील राष्ट्रीयीकृत  बँकेत देय असलेला डिमांड ड्राफ्ट तसेच प्रपत्रानुसार घोषणापत्र ही आवश्यक असते.
  • A4 आकारातील पाकीट व तीस रुपयांचे पोस्टल स्टॅम्प
  • अर्जाबाबतची माहिती व प्रपत्र यांचे नमुने http://dgft. Delhi. Nic. In या वेबसाईटवर उपलब्ध असतात. प्रपत्रातील तपशीलवार माहिती भरून अर्जदाराने सहसंचालक विदेश व्यापार यांच्या पुणे किंवा मुंबई कार्यालयात स्वतःच्या हस्ते किंवा नोंदणीकृत टपाल सेवेने सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.  
  • त्यानंतर हा आयात निर्यात परवाना मिळाल्यानंतर निर्यात ऋद्धी परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते. यासाठी कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा APEDA, नवी दिल्ली यांच्या विभागीय कार्यालय किंवा अपेडाच्या वेबसाईटवर नोंदणी करता येते.

 


शेतमाल सुरक्षिततेबाबत हमी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ग्लोबल गॅप सर्टिफिकेट 
  • आरोग्य विषयक प्रमाणपत्र
  • पॅक हाऊस प्रमाणपत्र
  • ऍगमार्क प्रमाणपत्र
  • सॅनिटरी प्रमाणपत्र इत्यादी प्रकारचे कागदपत्र आवश्यक असतात.

       आयातदार कसा शोधावा

 या सगळ्यात प्रक्रियेनंतर आपल्याला भाजीपाला व तत्सम कृषी उत्पादने निर्यात करता येतात.  परंतु ते घेण्यासाठी बाहेरील देशातील आयातदार शोधावा लागतो, त्यासाठी अपेडा सारख्या संस्थांच्या वेबसाइटवर जाऊन माहिती उपलब्ध करता येते.  त्यानंतर आयातदाराची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आयातदाराशी संपर्क साधून आपल्या भाजीपाला मालाची माहिती द्यावी लागते. संबंधित आयातदाराची बाजारातील प्रततपासणे फार आवश्यक असते.  हे प्रत तपासणीचे काम एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून केले जाते.  निर्यातीसाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी, विमानात किंवा जहाजात जागा आरक्षित करण्यासाठी आणि कस्टम क्लिअरिंगसाठी सीएचए( कस्टम हाऊस एजंट) ची नियुक्ती करणे फायद्याचे असते.  हे एजंट मुंबई व पुण्यात उपलब्ध असतात.  जर शेतकऱ्यांनी वरीलपैकी कागदपत्रांची पूर्तता केली आणि व्यवस्थित तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळवली तर आपण निर्यात क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळवून आपली आर्थिक परिस्थिती उंच करू शकतो.

 साभार-www.agridevolapmenttrustbaramati.org

English Summary: Learn how to export your farm produce Published on: 17 August 2020, 11:05 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters