सध्या बाजारभावात मोठे बदल घडून आले आहेत यामागे अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. गेल्या वर्षभरापासून शेतकरी वर्गाला नेहमी वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मध्ये अवकाळी पाऊस त्यानंतर कडकडीत थंडी आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे सध्या बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. त्यामुळे फळे आणि भाजीपाला यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या हंगामात डाळिंब, केळी, मोसंबी,संत्री या फळांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत:
यंदाच्या वर्षी वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीखालील क्षेत्र सुद्धा कमी झाले आहे. या मुळे उत्पन्न कमी झाल्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.श्रीमंत लोकांचं फळ म्हणजे सफरचंदाला ओळख आहे. परंतु सफरचंदाचा दर्जा डाळिंबाला मिळाला आहे. सध्या मार्केट मध्ये सफारचंदापेक्षा डाळिंबाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत आहे. गेल्या वर्ष्यात हवामानातील बदलामुळे हे शक्य झाले आहे.
परंतु वातावरणातील बदलामुळे अनेक फ्लबागेतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले आहे. योग्य काळजी आणि व्यवस्थापन फळबागांना आवश्यक आणि महत्वाचे असते. यामध्ये वातावरण झालेल्या बदलामुळे फळबागांवर रोगराई पसरली तसेच कीड इत्यादी मुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे उत्पन्न कमी निघाल्या मुळे बाजारात फळांची आवक कमी होऊ लागली आणि भावात वाढ होऊ लागली. यामुळे बाजारात भाज्यांच्या आणि फळांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे.
गेल्या 2 दिवसात बाजार समितीमध्ये डाळिंबाला 150 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत आहे. आणि हा भाव वाढत जाण्याची शक्यता आहे.गेल्या 2 दिवसापासून बाजार समिती मध्ये फळांना मोसंबी 100प ते 6000, संत्रा 500 ते 2300 , डाळिंब 1000 ते 1500, अननस 250 – 500 आणि चिकू 500 ते 2000, सफरचंद 7000 ते 12000 या प्रमाणे भाव मिळत आहेत. त्यामुळे यंदा फलबागतदारांची चांदी होणार आहे.
Share your comments