दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प हा जाहीर होत असतो. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक बाबींचा विचार केलेला असतो.दरवर्षी राज्याचा आणि केंद्राचा अर्थसंकल्प हा मार्च महिन्यामध्ये सादर होत असतो यामध्ये अनेक गोष्टीचा बदला सुद्धा केलेला असतो. या मध्ये पर्यटन, शेती, व्यवसाय, उद्योगधंदे, दळणवळण यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.
यंदाचा अर्थसंकल्प राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतीसंबंधीत अनेक गोष्टीचा विचार केला आहे. तसेच शेतकऱ्याचे हित पाहून हा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीकरी वर्गाचा चांगल्या प्रकारे विचार केला आहे यामध्ये शेतकरी वर्गाला अनेक माध्यमातून मदत करण्याचे आवाहन अजित दादांनी दिले आहे
अर्थसंकल्पात शेतीसंबंधीत सादर केलेल्या बाबी:-
1) जे शेतकरी आपले कर्ज नियमित आणि वेळेत फेडतात अश्या कर्जफेड करणणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना 2022 आणि 2023 मध्ये 10 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार.
2)शेततळ्याच्या अनुदानात वाढ करणारी तरतूद, पूर्वी शेत तळ्याच्या निर्मितीसाठी 50 टक्के अनुदान दिले जायचे परंतु तेच अनुदान 75 टक्के केले आहे. हे शेतकरी वर्गाच्या फायदेशीर आहे.
3)या अर्थसंकल्पात राज्याच्या कृषी विभागासाठी 3025 कोटींचा निधी प्रस्थापित केला आहे.
4)याचबरोबर शेतीसंबंधीत असलेले लहान उद्योगांसाठी सुद्धा मदत जाहीर केली आहे यामध्ये सहकार, पणन विभाग,आणि वस्त्र उद्योग यांसाठी 15212 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
5)येत्या 2022 आणि 2023 साली राज्यात सिंचनाचे 22 प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला जाईल.
6)राज्यातील जलसंधारण आणि मृदा विभागाला 3533 कोटी रुपये प्रस्थापित करण्यात येतील.
7) राज्यामधील 1लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग चा विस्तार केला जाईल. या फळबाग उद्धिष्ट साठी 540 कोटी प्रस्थापित करण्यात येतील.
8)शेतीबरोबरच पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि दुग्ध विकास विभागासाठी 406 कोटी प्रस्थापित करण्यात येणार आहे.
Share your comments